TRENDING:

उन्हाळ्यात जेवण जात नाही? सोप्या पद्धतीने बनवा आंबट-गोड कैरीची कढी, खाल एकदम आवडीने

Last Updated:
दुपारच्या जेवणात ही कढी असेल, तर जेवणाची चव तर वाढतेच, शिवाय उष्णतेपासून थोडा दिलासाही मिळतो. अमरावती येथील वृषाली भुजाडे यांनी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगितली आहे.
advertisement
1/7
उन्हाळ्यात जेवण जात नाही? सोप्या पद्धतीने बनवा आंबट-गोड कैरीची कढी, खाल एकदम आवडीने
उन्हाळा म्हटलं की कैरीचे विविध पदार्थ हमखास बनवले जातात. लोणचं, चटणी यांसोबतच आता थोडं वेगळं काही ट्राय करायचं असेल, तर आंबट-गोड कैरीची कढी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
advertisement
2/7
दुपारच्या जेवणात ही कढी असेल, तर जेवणाची चव तर वाढतेच, शिवाय उष्णतेपासून थोडा दिलासाही मिळतो. अमरावती येथील वृषाली भुजाडे यांनी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगितली आहे.
advertisement
3/7
कढी बनविण्यासाठी लागणारे साहित्य : शिजवलेल्या कैरीचा गर, तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक केलेले शेंगदाणे, साखर किंवा गूळ, हळद, मीठ, बेसन पीठ, लसूण आणि लाल मिरची हे साहित्य लागेल.
advertisement
4/7
कढी बनविण्याची कृती : सुरुवातीला कैरीच्या गरामध्ये बेसन पीठ घालून त्याचे गाठी न राहता नीट मिश्रण तयार करून घ्यावे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करावे.
advertisement
5/7
तेल तापल्यावर जिरे आणि मोहरी टाकून फोडणी द्यावी. पुढे लाल मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून परतावे. यानंतर त्यात लसूण घालून थोडा परतून घ्यावा आणि मग शेंगदाण्याचे कूट टाकावे.
advertisement
6/7
सगळे मिश्रण एकजीव झाल्यावर हळद घालावी आणि लगेच कैरी-बेसनचे मिश्रण त्यात ओतावे. आता हे मिश्रण सतत हलवत शिजवावे. गरजेनुसार पाणी घालून कढीची कंसिस्टन्सी ठरवू शकता. चवीनुसार मीठ आणि साखर किंवा गूळ घालावे. शेवटी कढीला एक चांगली उकळी येऊ द्यावी.
advertisement
7/7
उकळी आल्यानंतर गरमागरम आंबट-गोड कढी सर्व्ह करण्यासाठी तयार होते. ही कढी बनवताना कैरी उकडण्याऐवजी भाजून घेतली, तर चव अधिक छान लागते. उन्हाळ्यात झटपट तयार होणारी ही खास कढी एकदा नक्की करून पाहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात जेवण जात नाही? सोप्या पद्धतीने बनवा आंबट-गोड कैरीची कढी, खाल एकदम आवडीने
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल