भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली सीरिज 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. वनडे मॅच तिरुवनंतपुरम, गुवागाटी आणि न्यू चंडीगढ येथे होतील. तर टी-20 सामने लखनऊ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू येथे होणार आहेत. बंगळुरूमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर 2024 मध्ये झाला होता.
भारत-श्रीलंका सीरिज
यानंतर 13 डिसेंबर ते 27 डिसेंबरदरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात सीरिज होईल. या सीरिजमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळवल्या जातील. वनडे सामने दिल्ली, बंगळुरू, आणि अहमदाबाद येथे होतील. तर टी-20 सामने राजकोट, कटक आणि पुण्यात आहेत.
advertisement
झिम्बाब्वेची टीम भारतात
जानेवारी महिन्यात झिम्बाब्वेची टीम भारत दौऱ्यावर येणार असून या सीरिजमध्ये 3 वनडे सामन्यांची सीरिज होईल. हे सामने कोलकाता, हैदराबाद आणि मुंबईमध्ये होणार.
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज
घरच्या हंगामामध्ये टीम इंडिया फक्त एक टेस्ट सीरिज खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या गावसकर-बॉर्डर ट्रॉफीमध्ये 5 टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत. ही सीरिज 21 जानेवारी ते 7 मार्चदरम्यान होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टेस्ट मॅच नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, रांची आणि अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत.
टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या भवितव्याच्या दृष्टीने ही टेस्ट सीरिज अत्यंत महत्त्वाची आहे. घरच्या मैदानात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव करणे गरजेचं आहे.
