TRENDING:

उन्हाळ्यात तोंडाला येईल चव, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा कैरीचे लोणचं, संपूर्ण रेसिपी

Last Updated:
जेवणासोबत काहीतरी चटपटीत, तिखट-गोड लागणारं असावं असं अनेकांना वाटतं. रोजच्या जेवणात साध्या भाजी-आमटीसोबत जर थोडं खास काही मिळालं, तर जेवणाची मजाच काही और असते. अशावेळी घरच्या घरी झटपट तयार होणारं कैरीचं लोणचं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
advertisement
1/8
उन्हाळ्यात तोंडाला येईल चव, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा कैरीचे लोणचं, संपूर्ण रेसिपी
उन्हाळा सुरू झाला की बाजारात ताज्या कैऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. या कैऱ्यांपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. काही जण वर्षभर टिकणारं लोणचं बनवतात, तर काही जण कमी दिवसांसाठी खाता येईल असं साधं आणि झटपट तयार होणारं लोणचं बनवण्याला प्राधान्य देतात.
advertisement
2/8
जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा लगेच खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असेल, तर हे सोपं कैरीचं लोणचं तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. विशेष म्हणजे हे लोणचं अगदी घरगुती साहित्य वापरून तयार होतं आणि चार ते पाच दिवस सहज टिकतं.
advertisement
3/8
लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक काप केलेली ताजी कैरी, तेल, मीठ, साखर, हळद, जिरे, मोहरी आणि लाल तिखट. हे सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतं, त्यामुळे वेगळं काही आणण्याची गरज भासत नाही.
advertisement
4/8
लोणचं बनवण्याची कृती: सर्वप्रथम ताजी कैरी स्वच्छ धुऊन तिचे बारीक काप करून घ्या. हे काप एका स्वच्छ आणि कोरड्या भांड्यात काढा. त्यानंतर त्यात मीठ घालून कैरीला नीट मुरू द्या.
advertisement
5/8
मीठामुळे कैरी थोडी मऊ होते आणि तिचा नैसर्गिक आंबटपणा अधिक खुलतो. यानंतर आपल्या चवीनुसार लाल तिखट घाला आणि ते कैरीमध्ये चांगलं मिक्स करा. पुढे हळद घालून मिश्रणाला आकर्षक रंग आणा. हळदीमुळे लोणच्याला छान पिवळसर रंग येतो आणि त्याची चवही वाढते.
advertisement
6/8
आता एका छोट्या कढईत तेल गरम करून घ्या. तेल चांगलं तापल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाका. मोहरी तडतडली आणि जिरे छान परतले की ही फोडणी तयार झालेली असते. ही गरम फोडणी लगेच कैरीच्या मिश्रणावर ओता. त्यानंतर सर्व साहित्य नीट एकजीव होईल अशा प्रकारे मिक्स करा. शेवटी त्यात साखर घाला.
advertisement
7/8
साखर घातल्यामुळे लोणच्याला हलका गोडवा येतो, जो आंबट आणि तिखट चवीसोबत अप्रतिम लागतो. साखर घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या. अशा प्रकारे तयार झालेलं हे झटपट कैरीचं लोणचं काही तासांनंतरच खाण्यास तयार होतं.
advertisement
8/8
भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत हे लोणचं खाल्लं तर जेवणाची चव अनेक पटींनी वाढते. कमी वेळात आणि कमी मेहनतीत तयार होणारं हे लोणचं प्रत्येक घरात नक्की करून पाहण्यासारखं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात तोंडाला येईल चव, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा कैरीचे लोणचं, संपूर्ण रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल