TRENDING:

कल्याणकरांसाठी महत्त्वाची बातमी, रामनवमीनिमित्त वाहतुकीत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Last Updated:

कल्याणकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त ठाणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : कल्याणकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त ठाणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. गुरुवारी 26 मार्च रोजी रामनवमीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यासंदर्भात विशेष अधिसूचना जारी केली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
News18
News18
advertisement

रामनवमीच्या निमित्ताने हे बदल दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत राहतील. प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा आणि मिरवणुकीतील वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे.

Weather Alert : महाराष्ट्रात पुढील 24 तास अवकाळी पावसाचे, हवामान खात्याचा 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट

वाहतूक बंदी

दुर्गामाता चौक कडूनलाल चौकी मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.

advertisement

पर्यायी मार्ग: सदरची वाहने दुर्गामाता चौक येथे डावीकडे वळण घेऊन आधारवाडी चौक - खडकपाडा मार्गे आणि उजवीकडे वळण घेऊन गोविंदवाडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

श्रीराम नवमी मिरवणूक मार्गावर नो पार्किंग असे फलक लावण्यात आले असून पार्किंग कडक बंदी असेल.

नो पार्किंग झोन (पूर्ण बंदी):

पारनाका ते लाल चौकी कडे जाणाऱ्या रोडवर

advertisement

टिळक चौक भटारचावडी चौकाकडे जाणाऱ्या रोडवर

अभिनव मंदिर गल्ली

अहिल्याबाई चौक ते सहजानंद चौककडे जाणाऱ्या रोडवर

अहिल्याबाई चौक ते पेलदेवडी चौककडे जाणाऱ्या रोडवर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

वाहतूक शाखेकडून नागरिकांना नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
कल्याणकरांसाठी महत्त्वाची बातमी, रामनवमीनिमित्त वाहतुकीत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल