IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
संजीव गोयंका यांनी आयपीएलआधीच रिषभ पंतला स्पष्टच इशारा देत सांगितलं आहे,यंदा प्लेऑफमध्ये पोहोचून चालणार नाही.
advertisement
1/8

आयपीएलमध्ये लखनऊ सूपर जाएटसचे मालक संजीव गोयंका स्पर्धे दरम्यान प्रचंड चर्चेत असतात. मैदानावरची त्यांची रिॲक्शन आणि खेळाडूंसोबत संजीव गोयंकांच वागण नेहमी चर्चेत असले.
advertisement
2/8
तुम्हाला आठवत असेल 2024 चा तो सामना, ज्यावेळेस सनरायझर्स हैदराबादने लखनऊचा 10 विकेट राखून पराभव केला होता. या पराभवानंतर बाऊन्ड्री लाईनवर संजीव गोयंका केएल राहुलवर प्रचंड भडकले होते.या संपूर्ण राड्याचा फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले होते.
advertisement
3/8
या सगळ्या घडामोडीनंतर केएल राहुलची हकालपट्टी करून संजीव गोयंका यांनी रिषभ पंतची 27 करोडमध्ये खरेदी करत त्याच्या खांद्यावर लखनऊ सुपर जाएटसच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.
advertisement
4/8
पण कॅप्टन बदलल्यानंतरही संघाची स्थिती फारशी काही बदलली नाही.संघ सातव्या स्थानीच कायम राहिला.अशापरिस्थितीत संजीव गोयंका यांनी आयपीएलआधीच रिषभ पंतला स्पष्टच इशारा देत सांगितलं आहे,यंदा प्लेऑफमध्ये पोहोचून चालणार नाही.
advertisement
5/8
लखनऊ सूपर जाएटसच्या कामगिरीवर बोलताना संजीव गोयंका म्हणाले, मला वाटतं आमची खरी ओळख अजून बनायची आहे.पण जिथपर्यंत तुम्ही ट्रॉफी उलचत नाही, तिथपर्यंत तुम्हाला सन्मान आणि चाहत्यांच प्रेम मिळणार नाही,अशा शब्दान त्यांनी टीमला सुनावलं आहे.
advertisement
6/8
आम्ही दोनदा प्लेऑफमध्ये जागा बनवली, पण फक्त इतकं करून चालणार नाही.तुम्ही काही सामने जिंकता तर काही हारता. पण आता आपल्याला ट्रॉफी जिंकायची आहे, असे संजीव गोयंका रिषभ पंतला स्पष्ट सांगितले आहे.
advertisement
7/8
दरम्यान रिषभ पंतच्या खराब कामगिरीनंतर त्याच्याकडून कॅप्टन्सी हिसकावली जाईल, अशी चर्चा होती. पण या सगळ्या चर्चा आता संजीव गोयंका यांनी फेटाळल्या आहेत.
advertisement
8/8
तुम्ही नेहमी चांगलं करू शकता आणि पुढे जाऊ शकता. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा शेवट नाही आहे.पण शेवटी ही टीम अशी आहे ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे.त्यामुळे आता एक टीम म्हणून चांगल प्रदर्शन करा व्यक्तिगत प्रदर्शन करायला जाऊ नका. मागच्या हंगामात अनेक खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरी चांगली केली, पण यंदा टीम म्हणून मैदानात चांगल प्रदर्शन करा असा संदेश संजीव गोयंका यांनी लखनऊच्या खेळाडूंना दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा