TRENDING:

Mangal Uday 2026: खूप दिवसांनी अमंगळ सरलं! आज मंगळाच्या उदयाने या राशींचे भाग्य उजळणार, धनवर्षाव

Last Updated:
Mangal Uday 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी-नक्षत्र परिवर्तन होण्यासोबतच अस्त आणि उदय या गोष्टी ठराविक काळांनी होत असतात. मंगळ ग्रहाला आणि त्याच्या स्थितीला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं स्थान दिलंय. आज रामनवमीचा दिवस असतानाच म्हणदे 26 मार्च 2026 रोजी मंगळाचा उदय होत आहे. सध्या मंगळ ग्रह कुंभ राशीत भ्रमण करत आहे.
advertisement
1/7
खूप दिवसांनी अमंगळ सरलं! आज मंगळाच्या उदयाने या राशींचे भाग्य उजळणार, धनवर्षाव
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा शक्ती अंगातील ऊर्जा-उत्साह आणि धैर्याचा कारक ग्रह मानला जातो. मंगळाच्या उदयामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल आणि कोणी काय उपाययोजना करावी याविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/7
मेष - मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळच असून हे भ्रमण तुमच्या राशीपासून 11 व्या घरात होत आहे, ते लाभाचे स्थान मानले जाते. या काळात, करिअर आणि व्यवसायात हमखास यशाच्या संधी मिळतील. ज्यांची पदोन्नती रखडली आहे त्यांना आता चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
3/7
मेष राशीचे जे लोक नवीन नोकरी किंवा करिअर सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असेल. व्यावसायिक लोकांच्या नफ्यातही वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. या काळात आर्थिक परिस्थितीही चांगली राहील. उपाय म्हणून शांत मनाने हनुमान चालिसाचे पठण करा.
advertisement
4/7
वृषभ - मंगळ तुमच्या राशीपासून दहाव्या घरात उदय पावत असून ते घर कार्य आणि करिअरचे घर आहे. हा काळ नोकरी आणि व्यवसाय दोन्हीमध्ये चांगल्या संधी घेऊन येईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल, तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. पण, या काळात तुम्हाला तुमच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल, कारण राग किंवा आक्रमकतेमुळे तुमच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते.
advertisement
5/7
धनु - मंगळ धनु राशीपासून तिसऱ्या घरात उदय पावत असून ते घर शौर्य आणि धैर्याचे स्थान मानतात. त्यामुळे तुमचा कामातील आत्मविश्वास वाढेल, तुम्ही तुमची कामे पूर्ण उत्साहाने पूर्ण कराल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये यश मिळण्याच्या संधी निर्माण होतील. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. या काळात केलेला प्रवासही फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
6/7
कुंभ - मंगळ तुमच्या राशीत उदय पावत असल्यानं कामांचा धडाका लागू शकतो. कामात आत्मविश्वास आणि ऊर्जा दोन्ही बहरतील. मेहनतीचे फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील, व्यवस्थापन तर अगदी जबरदस्त करू शकाल. हा काळ व्यावसायिकांसाठीही फायदेशीर असेल. फक्त राग आणि चिडचिडेपणा नियंत्रणात ठेवला पाहिजे.
advertisement
7/7
इतर काही राशींनाही मंगळाच्या शुभ प्रभावाचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी नियमितपणे सकाळी स्नान केल्यानंतर देवघरात बसून भगवान हनुमानाचे ध्यान करा, हनुमान चालिसाचे पठण करा, आरती करा. जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा. या गोष्टींनी मंगळाच्या शुभ प्रभावाचा लाभ मिळू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Uday 2026: खूप दिवसांनी अमंगळ सरलं! आज मंगळाच्या उदयाने या राशींचे भाग्य उजळणार, धनवर्षाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल