TRENDING:

सावधान! 'या' 5 राशींची आजपासून सुरू झालीय उलटी गिनती, बँक बॅलन्स बिघडणार; आयुष्यात वाढणार अडचणी

Last Updated:
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, संपत्ती, सौंदर्य आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रहाने आज पहाटे 04 वाजून 50 मिनिटांनी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश केला आहे.
advertisement
1/7
सावधान! 'या' 5 राशींची आजपासून सुरू झालीय उलटी गिनती, बँक बॅलन्स बिघडणार; आयुष्यात वाढणार अडचणी
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, संपत्ती, सौंदर्य आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह आज, 26 मार्च 2026 रोजी पहाटे 04 वाजून 50 मिनिटांनी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश केला आहे. शुक्राचे हे राशी परिवर्तन सर्व राशींच्या आर्थिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम करणारे ठरेल.
advertisement
2/7
मात्र, ज्योतिषीय गणनेनुसार 5 राशींसाठी शुक्राचे हे गोचर आव्हानात्मक ठरू शकते. या काळात या राशींच्या जातकांना आर्थिक ताण आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
मेष - स्वभावात चिडचिड आणि आरोग्य: शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या स्वभावात थोडा अहंकार किंवा हट्टीपणा येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः डोळे किंवा त्वचेशी संबंधित समस्या जाणवू शकतात. जोडीदारासोबत विनाकारण वाद होण्याची शक्यता असल्याने शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
कर्क - कार्यक्षेत्रात आव्हाने आणि ताण: कर्क राशीच्या लोकांसाठी हे गोचर संमिश्र फळ देणारे असेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. घरगुती कारणांमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल.
advertisement
5/7
कन्या - खर्चात मोठी वाढ: कन्या राशीच्या अष्टम भावात शुक्राचे भ्रमण होणार आहे. या काळात तुमचे अनावश्यक खर्च अचानक वाढू शकतात, ज्यामुळे तुमचे बजेट कोलमडण्याची भीती आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.
advertisement
6/7
मकर - कौटुंबिक कलह आणि मालमत्ता वाद: मकर राशीच्या जातकांना या काळात कुटुंबात सुख-शांतीची कमतरता जाणवू शकते. आईच्या तब्येतीची चिंता सतावेल. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित व्यवहारात अडथळे येऊ शकतात. घराच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
मीन - आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधांत दुरावा: मीन राशीतून शुक्र बाहेर पडल्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनात अडचणी येऊ शकतात. विलासी वस्तूंवर अवाजवी खर्च केल्याने खिसा रिकामा होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोडीदाराशी संवाद वाढवा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! 'या' 5 राशींची आजपासून सुरू झालीय उलटी गिनती, बँक बॅलन्स बिघडणार; आयुष्यात वाढणार अडचणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल