जगातील लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने आपल्या यूझर्ससाठी धमाकेदार ऑफर आणलीये. या ऑफर अंतर्गत तुम्ही YouTube Premium चा आनंद अगदी 2 महिने फ्रीमध्ये घेऊ शकता. YouTube Premium हे एक किंवा दोन आठवड्यांसाठी फ्री ट्रायल देत असते. पण आता या ऑफरमुळे तुम्हाला चक्क 2 महिने जाहिरात फ्री व्हिडिओ पाहता येतील. यात तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाहीये. या ऑफरविषयी जाणून घेऊया.
advertisement
ChatGPT ला 'हे' 5 प्रश्न विचारणं पडू शकतं महागात! आधी पाहा आणि व्हा सावध
यात काय सुविधा मिळतील?
YouTube Premium च्या फ्री ट्रायलमध्ये पेड सब्सक्रायबर्सला मिळणारे सर्व फीचर्स मिळतील.
- Ad-free Videos तुम्हाला पाहता येणार आहेत.
- मोबाईलमध्ये दुसरे अॅप्स चालवताना किंवा स्क्रीन लॉक झाल्यावरही व्हिडिओ आणि म्यूझिक चालू राहील.
- व्हिडिओ Full HD क्वालिटी मध्ये डाउनलोड करुन नंतर पाहण्याची सुविधा मिळेल.
- YouTube Music चं फ्री अॅक्सेस तुम्हाला मिळेल.
ChatGPT ला 'हे' 5 प्रश्न विचारणं पडू शकतं महागात! आधी पाहा आणि व्हा सावध
ऑफर कशी मिळवायची?
- सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनमध्ये YouTube अॅप ओपन करा.
- खाली उजव्या बाजूला दिलेल्या You टॅब म्हणजेच प्रोफाइल आयकनवर क्लिक करा.
- खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला Get YouTube Premium चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा.
- तुम्ही या ऑफरसाठी एलिजिबल असाल तर तिथे 2 months freeचं बॅनर दिसेल.
- आता Try 2 months for 0 वर क्लिक करा.
या गोष्टी ठेवा लक्षात
आपले पेमेंट डिटेल्स म्हणजेच यूपीआय किंवा कार्ड भरा. ट्रायल संपल्यानंतर तुम्ही हे कधीही कॅन्सल करू शकता. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. तुम्ही केलं नाही तर दोन महिन्यानंतर तुम्हाला तिसऱ्या महिन्याची YouTube Premium ची फीस द्यावी लागेल. ही फीस तुमच्या अकाउंटमधून कट होईल.
