advertisement

ChatGPT ला 'हे' 5 प्रश्न विचारणं पडू शकतं महागात! आधी पाहा आणि व्हा सावध

Last Updated:

ChatGPT चा सध्याच्या काळात प्रचंड वापर होतो. लोक काहीही प्रॉब्लम आल्यास किंवा काही कळत नसल्यास चॅटजीपीटीला प्रश्न विचारतात. पण असं करणं हे महागात पडू शकतं.

चॅटजीपीटी सेफ्टी
चॅटजीपीटी सेफ्टी
मुंबई : चॅटजीपीटीचं युग सुरू झालंय. आजची तरूण पिढी ही चॅटजीपीटीला फक्त प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं टूल मानत नाही. तर आपला मित्र, सल्लागार आणि पार्टनर मानतात. अनेक लोकं हे ऑफिसच्या कामांसाठी, भांडणं सोडवण्यासाठी, एवढंच नाही तर आयुष्यातील मोठे निर्णय घेण्यासाठीही एआयचा सल्ला घेतात. मात्र फर्स्टपोस्टच्या पल्की शर्मा यांनी सांगितलंय की, काही गोष्टी एआयला कधीच विचारू नका. त्या गोष्टी कोणत्या आहेत पाहूया.
पहिला प्रश्न 
अत्यंत पर्सनल आणि संवेदनशील गोष्ट चॅटजीपीटीवर कधीच शेअर करू नका. म्हणजेच पासवर्ड, बँक अकाउंट डिटेल्स, ऑफिसचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स किंवा मग एखादी अशी गोष्ट जी तुम्ही चारचौघात मोठ्याने सांगू शकणार नाही. ती चॅटजीपीटीलाही सांगू नका. कारण एआय ही प्रायव्हेट डायरी नाही. ती एक क्लाउड नोटबुक प्रमाणे शेअर होऊ शकतं. तुमचा डेटा कंपनीच्या सर्व्हरवर जातो. तिथून तो लीक होण्याचा धोका असतो. म्हणूनच विचार करुनच निर्णय घ्या.
advertisement
दुसरा प्रश्न 
काही लोक हे चॅटजीपीटीचा वापर थेरीपीसाठी करता. एका अभ्यासानुसार, लोक भावनिक समस्यांसाठी एआयसोबत बोलतात. मोडिकलचे प्रश्न विचारुन औषधं घेणंही हानिकारक ठरू शकतं. एआयला फक्त तुम्ही जे सांगता तेच कळत असतं. ते तुम्हाला पाहून आजाराचं निदान करू शकतं नाही. म्हणून औषधींसाठी याचा कधीच उपयोग करू नका.
advertisement
तिसरा प्रश्न 
कोणत्याही बेकायदेशीर किंवा हानिकारक गोष्टी विचारू नका. म्हणजेच हॅकिंग कशी करावी, बॉम्ब कसा बनवावा, मर्डर कसा करावा किंवा क्राइम संबंधित कोणतेही प्रश्न विचारू नका. तुम्ही कुतुहल म्हणून प्रश्न विचाराल. पण एआय कंपन्या अशा प्रॉम्प्टसला मॉनिटर करतात आणि सिस्टम फ्लॅग करू शकते आणि तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कायद्याच्या विरोधात काहीही विचारणं चुकीचं ठरतं. ज्यामुळे तुम्ही धोक्यात येऊ सकता.
advertisement
चौथा प्रश्न 
चॅटजीपीटी किंवा एआयला कधीच षड्यंत्र सिद्धांत किंवा कांस्पिरेसी थ्योरीविषयी विचारू नका. एआय कधी-कधी हॅलुसिनेट करते. म्हणजेच पूर्णपणे चुकीची माहिती प्रदान करते. पल्की शर्मा म्हणतात की, तुम्ही एखादी कांस्पिरेसी थ्योरी विचाराल, तर एआय त्याला मजबूत करू शकते. हे खोट्या गोष्टींना फॅक्ट प्रमाणे पाहते. ज्यामुळे लोक चुकीच्या रॅबिट होलमध्ये अडकतात. अनेक खऱ्या घटना अशा आहेत, ज्यामध्ये चुकीच्या माहितीमुळे लोकांना नुकसान झालंय. एआय विचार न करता उत्तर देते. यामुले कॉस्पिरेन्सी सारख्या विषयांवर विश्वास ठेवू नका.
advertisement
पाचवा प्रश्न 
नोकरी सोडणे, नातं तोडणं, बॉसशी सामना करणं किंवा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय हे सर्व एआयवर सोडण्याची चूक कधीच करू नका. पल्की म्हणतात की, एआय रिहर्सल चांगली करते. पण निर्णय स्वतःच घ्या. एआयला संपूर्ण आयुष्य, नात्यांचा इतिहास , भावना किंवा खरा संदर्भ माहिती नसतो. तो क्लिन आणि सोपे उत्तर देतो. पण खऱ्या आयुष्यात हे एवढं सोपं नसतं. म्हणून पर्सनल गोष्टी एआयला विचारू नका.
advertisement
AI चा वापर कसा करावा?
एआयकडून तुम्ही आयडिया घेऊ शकता, सल्लाही घेऊ शकता. पण अंतिम निर्णय हा तुमचा असावा. कारण एआय हे अद्भुत टूल आहे. हेच आता भविष्य आहे. हे लिहिन्यात मदत करते, आयडिया जनरेट करण्यात मदत करते. पण त्याला डॉक्टर, थेरिपिस्ट, मित्र किंवा डिसीजन मेकर म्हणून पाहू नका.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ChatGPT ला 'हे' 5 प्रश्न विचारणं पडू शकतं महागात! आधी पाहा आणि व्हा सावध
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement