advertisement

मुंबईतील शिक्षिकेसोबत फेसबुकवर मैत्री; लॉजवर नेऊन ठेवले संबंध अन् मग सुरू झाला 'तो' भयंकर खेळ

Last Updated:

काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर तिची ओळख एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाशी झाली. आरोपीने गोड बोलून शिक्षिकेचा विश्वास संपादन केला.

आक्षेपार्ह व्हिडिओच्या जोरावर तब्बल ३३ लाख रुपये उकळले (प्रतिकात्मक फोटो)
आक्षेपार्ह व्हिडिओच्या जोरावर तब्बल ३३ लाख रुपये उकळले (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका 41` वर्षीय शिक्षिकेचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला मालवणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणे आणि आक्षेपार्ह व्हिडिओच्या जोरावर तब्बल ३३ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप या तरुणावर आहे. या घटनेने मुंबईच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मैत्रीचा गैरफायदा आणि ब्लॅकमेलिंग
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिका बोरीवली परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर तिची ओळख एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाशी झाली. आरोपीने गोड बोलून शिक्षिकेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला मालाड येथील मार्वे बीच, मिरा रोड आणि दहिसर चेक नाका परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंधावेळी आरोपीने शिक्षिकेच्या नकळत मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीकरण केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने शिक्षिकेकडे वारंवार पैशांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने आजवर आरोपीला तब्बल ३३ लाख रुपये दिले होते. मात्र, आरोपीची पैशांची हाव वाढतच गेल्याने अखेर त्रस्त झालेल्या शिक्षिकेने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
advertisement
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर मैत्री करताना आणि खाजगी माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी या निमित्ताने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतील शिक्षिकेसोबत फेसबुकवर मैत्री; लॉजवर नेऊन ठेवले संबंध अन् मग सुरू झाला 'तो' भयंकर खेळ
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement