Ladoo Recipe : रवा बेसनाचे विसराल; एकदा बनवा मऊसूत राघवदास लाडू, तोंडात विरघळतील! पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Raghavadas ladoo : या लाडवांची रेसिपीही एकदम सोपी आहे. राघवदास लाडू बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. विशेष म्हणजे हे लाडू न बिघडता बनतील.
मुंबई : आपल्याकडे रवा, बेसन अगदी मैद्याचेही लाडू बनवले जातात. पण तुम्ही राघवदास लाडूंबद्दल ऐकलंय का? हा एक पारंपरिक पदार्थ आहे. हे लाडू इतके मऊसूत बनतात की अगदी तोंडात टाकताच विरघळतील. या लाडवांची चव इतकी वापरातील आहे की तुम्ही एकदा खाल तर वारंवार बनवाल. या लाडवांची रेसिपीही एकदम सोपी आहे.
राघवदास लाडू बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. विशेष म्हणजे हे लाडू न बिघडता बनतील. या लाडवांची सोपी रेसिपी purely_home_plates या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे.
राघवदास लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- चणा डाळ
- साखर
- तूप
- सुकामेवा
- वेलची पूड
- पाणी
या पद्धतीनं बनवा राघवदास लाडू..
- सर्वात आधी 1 वाटी चणा डाळ रात्रभर भिजू घाला. एकवड्या डाळीमध्ये 9 ते 10 लाडू बनतील.
advertisement
- दुसऱ्या दिवशी डाळीचं सगळं पाणी काढून टाका आणि मिक्सरमध्ये एकदम मऊ वाटून घ्या.
- आता लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घाला.
- या तुपात वाटलेली डाळ घालून मध्यम आचेवर परतून घ्या.
- साधारण 15 ते 20 मिनिटं हे परतावं लागेल. मध्ये मध्ये थोडं तूप घालत रहा.
- मिश्रण हलकं, फुललेलं आणि सुगंधी झालं पाहिजे.
advertisement
- रंग सोनेरी ते हलका ब्राऊन रंग आला की डाळ तयार होते.
- आता वेगळ्या भांड्यात एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालून पाक तयार करा.
- एकतारी पाक किंवा थोडा पातळ पाक ठेवला तरी चालेल.
- पहिल्यांदा करत असाल तर पातळ पाक ठेवा. म्हणजे लाडू चांगले बनतील.
- तयार पाकामध्ये भाजलेलं चणा डाळीचं मिश्रण घाला आणि चांगलं एकजीव करा.
advertisement
- आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड टाका.
- मिश्रण थोडं कोमट झालं की लगेच लाडू वळायला सुरुवात करा.
advertisement
हे लाडू अगदी सहज वळले जातात. आणि काही तासाभरात बनून तयार होतात. फक्त तुम्हाला डाळ भिजवण्याची पूर्वतयारी करावी लागेल. कोणत्याही सणावाराला तुम्ही येऊ लाडू बनवून तुमच्या पाहुण्यांना खुश करू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 12:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Ladoo Recipe : रवा बेसनाचे विसराल; एकदा बनवा मऊसूत राघवदास लाडू, तोंडात विरघळतील! पाहा रेसिपी








