एक फोन करायचाय, मोबाईल देता का? ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, पुण्यातील महिलेसोबत नको ते घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
"जरा फोन करायचा आहे, तुमचा मोबाईल देता का?" असं म्हणत विश्वासाने घेतलेल्या मोबाईलचा वापर करून एका ५६ वर्षीय महिलेला तब्बल एक लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : "जरा फोन करायचा आहे, तुमचा मोबाईल देता का?" असं म्हणत विश्वासाने घेतलेल्या मोबाईलचा वापर भलत्याच कामासाठी झाला. यात एका ५६ वर्षीय महिलेला तब्बल एक लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारुंजी परिसरात घडलेल्या या 'डिजिटल' चोरीप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी जळगावच्या एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओळखीच्या व्यक्तींवरही डोळे झाकून विश्वास ठेवणे किती धोक्याचे ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गणेश विश्राम सोनवणे (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) हा फिर्यादी महिलेच्या ओळखीचा होता. २१ नोव्हेंबर २०२५ ते २४ मार्च २०२६ या दरम्यान तो त्यांच्या घरी येत-जात असे. एके दिवशी त्याने फोन करण्याच्या बहाण्याने महिलेकडे त्यांचा मोबाईल मागितला. महिलेनेही ओळखीचा मुलगा म्हणून विश्वासाने मोबाईल त्याच्या हातात दिला.
advertisement
बँकिंग ॲपचा असा केला गैरवापर
मोबाईल हातात मिळताच गणेशने त्यातील बँकिंग ॲपचा वापर करून अत्यंत शिताफीने महिलेच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्याने एकूण १ लाख ८ हजार ५८४ रुपये स्वतःच्या खात्यावर परस्पर वळवून घेतले. आपल्या खात्यातून पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. "आपला मोबाईल कोणालाही देताना किंवा कोणासमोरही पासवर्ड टाकताना काळजी घ्या. बँकिंग व्यवहार सुरक्षित आहेत याची खात्री करा," असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे मारुंजी परिसरात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 12:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
एक फोन करायचाय, मोबाईल देता का? ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, पुण्यातील महिलेसोबत नको ते घडलं





