आज रामनवमी! शुभ दिवशी बनतोय 'गजकेसरी' योग, 4 राशींचं नशीब पालटणार; प्रभू श्रीरामांच्या कृपेने सर्व काही मिळणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
देशभरात 'श्रीराम नवमी' मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून यंदाची रामनवमी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानली जात आहे, कारण आज चंद्र आणि गुरूच्या युतीतून अत्यंत शक्तिशाली असा 'गजकेसरी राजयोग' निर्माण झाला आहे.
advertisement
advertisement
मेष - प्रगतीचा नवा अध्याय: मेष राशीत सध्या शुक्र आणि चंद्राची अनुकूल स्थिती आहे. गजकेसरी योगामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. नोकरीमध्ये तुमच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाईल आणि पदोन्नतीचे प्रबळ संकेत आहेत. प्रभू श्रीरामांच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन धनलाभ होईल.
advertisement
वृषभ - आर्थिक सुबत्ता आणि मान-सन्मान: वृषभ राशीच्या जातकांसाठी हा राजयोग संपत्तीची दारे उघडणारा ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. भागीदारीतील व्यवसायातून मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
अडकलेले पैसे परत मिळतील: या राजयोगाच्या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता येईल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा जुने येणे बाकी असेल, तर ते या शुभ मुहूर्तावर परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक चिंता कायमची मिटू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









