TRENDING:

Bus Accident : काही सेकंदात सर्व काही संपलं… फेरीवरील बस पाण्यात कोसळल्याचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, 23 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated:

Bus Accident : एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात 25 मार्चला घडला, जो अंगावर काटा आणणारा आहे. सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे, तो पाहून कोणाचंही मन हेलावून जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपण जेव्हा प्रवासाला निघतो, तेव्हा सुरक्षितपणे घरी पोहोचू असा विश्वास मनात असतो. कधी बसने, कधी ट्रेनने तर कधी जहाजाने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. प्रवासादरम्यानचे ते निवांत क्षण आपण खिडकीबाहेर पाहत किंवा मोबाईलमध्ये रमून घालवतो. पण विचार करा, तुम्ही ज्या बसमध्ये बसला आहात ती सुरक्षित जागी उभी आहे आणि अचानक काही सेकंदात ती थेट अथांग नदीच्या पात्रात पडली तर... हा विचार करूनही अंगावर काटा येतो.
बंगलादेश बस अपघात
बंगलादेश बस अपघात
advertisement

असाच एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात 25 मार्चला घडला, जो अंगावर काटा आणणारा आहे. सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे, तो पाहून कोणाचंही मन हेलावून जाईल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक प्रवासी बस एका फेरीसाठी धक्क्यावर उभी होती. मात्र, अचानक या बसचं संतुलन बिघडलं आणि ती फेरीच्या कडेवरून थेट पद्मा नदीच्या खोल पात्रात कोसळली. बस पाण्यात पडताच काही प्रवाशांनी खिडकीतून बाहेर पडून पोहत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, काहींना किनाऱ्यावरील लोकांनी बाहेर ओढलं.

advertisement

मृत्यूचा तांडव आणि बचावकार्य

पोलिस निरीक्षक रसेल मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात आतापर्यंत 23 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बस राजबारीहून ढाका कडे जात होती. दौलतदिया येथील फेरी टर्मिनल क्रमांक 3 जवळ सायंकाळी 5 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. बसमध्ये अंदाजे 40 प्रवासी होते, मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते ही संख्या जास्त असू शकते कारण बसने वाटेत अनेक प्रवासी घेतले होते.

advertisement

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तासांच्या थरारानंतर बस बाहेर

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि नौदलाच्या डायव्हर्सनी (Divers) तातडीने बचावकार्य सुरू केलं. रात्रीची वेळ असल्याने कामात अडथळे येत होते, तरीही हम्झा नावाच्या बचाव जहाजाच्या मदतीने रात्री 11:30 च्या सुमारास क्रेनने ती बुडालेली बस नदीबाहेर काढण्यात आली. बसचा काही भाग पाण्याबाहेर येताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला.

advertisement

फेरीवर बस चढवताना किंवा तिथे उभी असताना ती योग्य प्रकारे लॉक केली होती का? ड्रायव्हरची चूक होती की तांत्रिक बिघाड? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही घटना केवळ एक अपघात नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशी ही रुग्णसेवा, छ. संभाजीनगरमध्ये गरजूंना होतीये मोठी मोफत मदत, अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

बांगलादेशमधील ही घटना आपल्याला प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचा इशारा देते. एक छोटीशी चूक किती जणांचे बळी घेऊ शकते, याचं हे भयंकर उदाहरण आहे. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Bus Accident : काही सेकंदात सर्व काही संपलं… फेरीवरील बस पाण्यात कोसळल्याचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, 23 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल