Birthday Wishes For Wife : प्रिय बायकोला वाढदिवशी फक्त गिफ्ट नाही, 'या' गोड शब्दांत शुभेच्छाही द्या..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Wife In Marathi : बायकोला तिच्या वाढदिवशी केवळ गिफ्ट देऊ खुश करू नका. तिचं गॉड शब्दात थोडं कौतुकही करा. बायकोचा वाढदिवस मग तुमच्यासाठीही आनंदाची पर्वणी ठरेल. आज आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे तुमच्या मनातील बायकोविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमची मदत करतील.
advertisement
1/13

माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस.. प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/13
मी खूप भाग्यवान आहे, कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळाली.. Very Happy Birthday My Dear Bayko..!
advertisement
3/13
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे, वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे.. प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/13
तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू नसावे, सुखांनी सदैव तुझ्या जवळ असावे, ह्याच माझ्या मनातील इच्छा आणि अपेक्षा, प्रत्येक क्षणी तू माझ्या जवळ असावे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
advertisement
5/13
घे हात हाती माझा, जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल, माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे अवघं ब्रम्हांडदेखील थिटं पडेल.. प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/13
नवे क्षितीज नवी पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
advertisement
7/13
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसरणं कधीच नाही शक्य.. Very Happy Birthday My Dear Bayko..!
advertisement
8/13
मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस, मी उमलणारे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस, मी एक देह तू त्यातला श्वास आहेस, बायको तुला
advertisement
9/13
ना संपत्तीची लालसा, ना कीर्तीची तहान, प्रत्येक जन्मात तू माझीच राहशील, हीच त्या देवाकडून आशा आहे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
advertisement
10/13
माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
advertisement
11/13
त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं, हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं, त्या माझ्या लाडक्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
advertisement
12/13
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी, मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
13/13
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Wife : प्रिय बायकोला वाढदिवशी फक्त गिफ्ट नाही, 'या' गोड शब्दांत शुभेच्छाही द्या..