TRENDING:

Mahashivratri 2026: अशी महाशिवरात्री 300 वर्षांनी आली! 4 राजयोग अन् 12 शुभ योग, या 3 राशींचा भाग्योदय

Last Updated:
Astrology Marathi: यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून महाशिवरात्री 2026 अत्यंत खास असणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या दुर्मिळ स्थितीमुळे या दिवशी 300 वर्षांनंतर एक अतिशय विशेष योग जुळून येत आहे. या दिवशी 12 शुभ योग आणि 4 राजयोग एकाच वेळी असणार आहेत.
advertisement
1/6
अशी महाशिवरात्री 300 वर्षांनी! 4 राजयोग अन् 12 शुभ योग, या 3 राशींचा भाग्योदय
या संयोगांचा अत्यंत शुभ प्रभाव 3 राशींच्या लोकांवर दिसून येईल, ज्यामुळे त्यांचे नशीब उजळणार आहे. या दिवशी कोणते शुभ योग बनत आहेत आणि कोणत्या राशींना याचा फायदा होईल ते जाणून घेऊया. 300 वर्षांनंतर जुळून येत असलेला दुर्मिळ संयोग महाशिवरात्रीवर 4 राजयोग..
advertisement
2/6
बुधादित्य राजयोग: सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे.लक्ष्मी नारायण राजयोग: बुध आणि शुक्राच्या युतीमुळे.शुक्रादित्य योग: सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे.चतुर्ग्रही योग: कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध, शुक्र आणि राहूच्या युतीमुळे.
advertisement
3/6
महाशिवरात्रीवर 12 शुभ योग: या महाशिवरात्रीला प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, साध्य, शिव, शुक्ल, शोभन, सर्वार्थसिद्ध, चंद्रमंगल, त्रिग्रही, राज आणि ध्रुव योग एकाच वेळी निर्माण होत आहेत.
advertisement
4/6
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हे योग करिअरच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरतील. हा काळ आर्थिक लाभाचे संकेत देत आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल आणि नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. तुम्ही ज्या कामात हात घालल, तिथे यश मिळेल.
advertisement
5/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होतील. धनधान्याची कोणतीही कमतरता भासणार नाही. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती खूप चांगली राहील. भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे.
advertisement
6/6
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री अत्यंत खास असेल. तुमच्यावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे, ज्यामुळे तुमची सर्व कामे मार्गी लागतील. धनसंचय आणि गुंतवणुकीसाठी ही शुभ वेळ आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये चांगला नफा मिळण्याचे योग आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mahashivratri 2026: अशी महाशिवरात्री 300 वर्षांनी आली! 4 राजयोग अन् 12 शुभ योग, या 3 राशींचा भाग्योदय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल