मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये वाढत्या गर्दीमुळे जागेवर बाचाबाची आणि धक्काबुक्कीचे प्रकार नवीन नाही. पण, आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलमध्ये परप्रांतीयांच्या गुंडगिरीचा प्रताप समोर आला आहे. ४ ते ५ परप्रांतीयांनी एका महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाला 'काट डालूंगा' अशी धमकी देत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. 4 ते ५ परप्रांतीयांनी एसी लोकलमध्ये घुसून बीकेसी इथं कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आकाश बाबर यांना मारहाण केली. याा घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आकाश बाबर हे कल्याण लोकलने प्रवास करत होते. त्याआधी परप्रांतीय तरुणासोबत आदल्या स्टेशनवर बाचाबाची झाली होती. त्यानंतर या परप्रांतीय तरुणाने आणखी आपल्या साथीदारांना फोन करून विक्रोळी स्थानकावर बोलावून घेतलं. त्यानंतर या जमावाने लोकलमध्ये घुसून बाबर यांना लोकलमध्ये मारहाण केली. शिवीगाळ करत बाबर यांना या परप्रांतीयांना मारहाण केला. 'तुम्हे अगर देखना है तो काट डालूंगा' अशी धमकीही दिली.
हा सगळा प्रकार लोकलमधील उपस्थितीत लोकांसमोर घडत होता. जेव्हा या परप्रांतीयांनी काट डालूंगा अशी धमकी दिली, तेव्हा इतर प्रवाशांनी आरडाओरडा करून त्याला हाकलून लावलं. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात इतर प्रवाशांनी कैद केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आकाश बाबर यांनी पुढील स्टेशनवर उतरून रेल्वे पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, धावत्या लोकलमध्ये एका महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण झाल्याची घटल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
