TRENDING:

Cooking Oil : 'या' देशी तेलासमोर महागडे परदेशी तेलही फेल; घरगुती जेवणासाठी स्वस्तात एकदम बेस्ट

Last Updated:
आपणही जाहिरातींना भुलतो आणि खिशाला कात्री लावून ही महागडी तेलं घरी आणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की ज्या आरोग्याच्या रहस्याचा आपण शोध घेतोय, ते रहस्य पिढ्यानपिढ्या आपल्याच स्वयंपाकघरात दडलंय?
advertisement
1/8
'या' देशी तेलासमोर महागडे परदेशी तेलही फेल; घरगुती जेवणासाठी स्वस्तात एकदम बेस्ट
आजकाल आपण कोणत्याही सुपरमार्केटमध्ये गेलो की शेल्फ्‌सवर 'ऑलिव्ह ऑईल' किंवा इतर परदेशी तेलांच्या चकचकीत बाटल्या दिसतात. आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून आपणही जाहिरातींना भुलतो आणि खिशाला कात्री लावून ही महागडी तेलं घरी आणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की ज्या आरोग्याच्या रहस्याचा आपण शोध घेतोय, ते रहस्य पिढ्यानपिढ्या आपल्याच स्वयंपाकघरात दडलंय?
advertisement
2/8
आपल्या पूर्वजांनी वापरलेलं आणि आपल्या मातीशी नातं असलेलं ते 'स्वस्त आणि मस्त' तेल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शेंगदाणा तेल (Groundnut Oil). जाहिरातींच्या झगमगाटात आपण या तेलाचे फायदे विसरलो आहोत, पण विज्ञानानेही आता मान्य केलंय की हे तेल खरोखरच आरोग्याचा खजिना आहे.
advertisement
3/8
बाजारात मिळणाऱ्या रिफाइंड ऑईल किंवा परदेशी तेलांच्या तुलनेत शेंगदाणा तेल भारतीय स्वयंपाकासाठी सर्वात जास्त योग्य मानलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे याचा 'स्मोकिंग पॉईंट'. याचा अर्थ असा की, हे तेल तुम्ही कितीही गरम केलं, तरी ते लवकर विषारी बनत नाही. त्यामुळे तळलेले पदार्थ (Deep Fry) किंवा फोडणीसाठी हे तेल एकदम सुरक्षित आहे.
advertisement
4/8
शेंगदाणा तेलात 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स' (MUFA) मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी करून 'गुड कोलेस्ट्रॉल' वाढवण्यास मदत करतात. परिणामी, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि तुमचं हृदय मजबूत राहतं.
advertisement
5/8
या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर असते. हे केवळ शरीरातील पेशींचे रक्षण करत नाही, तर तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणतं आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत करतं. इतकंच नाही तर, काही संशोधनानुसार, शेंगदाणा तेलातील पोषक तत्वे रक्तातील साखरेची पातळी (Diabetes) नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात.
advertisement
6/8
आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे रिफाइंड तेल वापरण्याची. कंपन्या तेल रिफाईन करताना ते प्रचंड गरम करतात आणि त्यात केमिकल्स मिसळतात, ज्यामुळे तेलातील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात. त्यामुळे नेहमी 'कोल्ड प्रेस्ड' (कच्च्या घाण्याचं) शेंगदाणा तेलच निवडा. ते थोडं महाग वाटेल, पण औषधांवर होणाऱ्या खर्चापेक्षा ते नक्कीच स्वस्त आहे.
advertisement
7/8
स्वयंपाकासाठी 'या' महत्त्वाच्या टिप्स विसरू नका:तेलाची मर्यादा: तेल कोणतंही असो, ते प्रमाणाबाहेर वापरणं टाळा.शरीराला सर्व पोषक तत्त्वे मिळावीत यासाठी दर महिन्याला तेल बदलणं उत्तम. शेंगदाणा तेलासोबतच आहारात अधूनमधून तीळ आणि मोहरीच्या तेलाचाही समावेश करा.एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरू नका. हे 'री-हीट' केलेलं तेल कर्करोगासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतं.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचव्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cooking Oil : 'या' देशी तेलासमोर महागडे परदेशी तेलही फेल; घरगुती जेवणासाठी स्वस्तात एकदम बेस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल