Skin Care Routine For Men : फेसवॉश ते सनस्क्रीन पुरुषांसाठी आवश्यक स्किन केअर स्टेप्स, फक्त 5 मिनिटांत चेहऱ्याची काळजी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
योग्य स्किन केअर रूटीन पाळल्यास हे टाळता येतं आणि त्वचेला निरोगी चमक मिळते. चला जाणून घेऊया पुरुषांसाठी सर्वोत्तम स्किन केअर स्टेप्स.
advertisement
1/7

महिलांच्या तुलनेत पुरुष फार कमी वेळा आपल्या स्किनची काळजी घेतात. पण तसं पाहिलं तर पुरुषांनाही त्वचेची योग्य काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं झालं आहे जितकं महिलांसाठी आहे. प्रदूषण, धूळ, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे पुरुषांची त्वचा लवकर कोरडी, निस्तेज किंवा तेलकट होते. योग्य स्किन केअर रूटीन पाळल्यास हे टाळता येतं आणि त्वचेला निरोगी चमक मिळते. चला जाणून घेऊया पुरुषांसाठी सर्वोत्तम स्किन केअर स्टेप्स.
advertisement
2/7
1. क्लेन्सिंग – धूळ आणि तेल काढादिवसभर बाहेर राहिल्याने त्वचेवर धूळ आणि तेल साचतं. सकाळी आणि रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा धुणं आवश्यक आहे. यामुळे रोमछिद्रे स्वच्छ राहतात आणि पिंपल्स होण्याची शक्यता कमी होते.
advertisement
3/7
2. मॉइश्चरायझिंग – त्वचेचं हायड्रेशन कायम ठेवापुरुषांची त्वचा साधारणतः जाडसर आणि ड्राय असते. त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर हलका मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. हे त्वचेला ओलावा देऊन निस्तेजपणा दूर करतं.
advertisement
4/7
3. सनस्क्रीन – सूर्यकिरणांपासून संरक्षणबाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्याहून जास्त असलेला सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेवर टॅनिंग, डाग आणि अकाली सुरकुत्या येणं टाळता येतं.
advertisement
5/7
4. स्क्रबिंग – मृत त्वचा काढाआठवड्यातून 1-2 वेळा फेस स्क्रब वापरून मृत त्वचा काढा. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते आणि काळे डाग कमी होतात.
advertisement
6/7
5. हेल्दी डाएट आणि पाणीफक्त बाह्य केअर पुरेसं नाही. पुरेसं पाणी पिणं, ताज्या भाज्या-फळं खाणं आणि तेलकट पदार्थ टाळणं त्वचेसाठी महत्त्वाचं आहे.
advertisement
7/7
6. पुरेशी झोपताणतणाव आणि अपुरी झोप त्वचेवर थेट परिणाम करते. दिवसाला किमान 7-8 तास झोप घेतल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि निस्तेजपणा कमी होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care Routine For Men : फेसवॉश ते सनस्क्रीन पुरुषांसाठी आवश्यक स्किन केअर स्टेप्स, फक्त 5 मिनिटांत चेहऱ्याची काळजी