TRENDING:

Gautami Patil : खरात फाईल्सवर पहिल्यांदा अन् कडक शब्दांत बोलली गौतमी पाटील, म्हणाली...

Last Updated:
Gautami Patil on Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी डान्सर गौतमी पाटिल हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. गौतमी पाटिलने कडक शब्दांत आपलं मत मांडलं आहे.
advertisement
1/7
 खरात फाईल्सवर पहिल्यांदा अन् कडक शब्दांत बोलली गौतमी पाटील, म्हणाली...
महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
advertisement
2/7
अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. अनेक कलाकारांनीही यावर भाष्य केल आहे. प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिने अशोक खरात प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/7
या संपूर्ण प्रकरणावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.
advertisement
4/7
TV 9 शी बोलताना गौतमी पाटील म्हणाली, "मी इतकंच बोलेन की यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई झाली पाहिजे. पुन्हा अशा गोष्टी घडू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा असं घडू नये यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे."
advertisement
5/7
गौतमी पाटीलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या महाराष्ट्रभर डान्सच्या कार्यक्रमांमुळे चर्चेत आहे. तिचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असून प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
6/7
याशिवाय तिचं 'मासोळी सोन्यावाणी' हे गाणं बिग बॉस फेम शिव ठाकरेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. तसेच 'कृष्ण सावळा' हे तिचे आगामी गाणेही लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय 'गच्चीवरून' या गाण्याचे रिक्रिएशनही तिने केले असून तेही चर्चेत आलं होतं.
advertisement
7/7
एकीकडे मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असताना गौतमीने समाजातील गंभीर विषयावर स्पष्ट भूमिका मांडताना दिसते. गौतमीने कडक शब्दांत अशोक खरात प्रकरणात आपलं मत मांडलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil : खरात फाईल्सवर पहिल्यांदा अन् कडक शब्दांत बोलली गौतमी पाटील, म्हणाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल