Coconut Water Side Effects: 'नारळपाणी म्हणजे अमृत' हा गैरसमज, 'या' लोकांसाठी ठरू शकतं जिवघेणं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Coconut Water Side Effects: हे वाचा अन्यथा उशीर होईल, दररोज नारळपाणी पिण्याने होऊ शकतात धोकादायक परिणाम
advertisement
1/9

नारळपाणी हे शरीरासाठी चांगलं आहार मानलं जातं. उन्हाळा असो की हिवाळा, सकाळी उपाशी पोटी किंवा दिवसभर कधीही नारळपाणी प्यायल्याने आरोग्यास खूप फायदे मिळतात. शरीर हायड्रेट राहते, त्वचा आणि केस निरोगी राहतात. त्यात असलेले व्हिटॅमिन C, E, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक शरीरासाठी उपयुक्त असतात.
advertisement
2/9
पण… हे सगळे फायदे आहेत म्हणून तुम्ही रोज नारळपाणी पित असाल, तर थांबा! काही लोकांसाठी हे आरोग्याला घातक ठरू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या लोकांनी नारळपाण्याचे सेवन टाळावे.
advertisement
3/9
१) किडनीच्या रुग्णांनी सावध राहावे! जर तुम्हाला किडनीसंबंधी समस्या असेल, तर नारळपाणी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. नारळपाण्यात जास्त प्रमाणात पोटॅशियम असते, जे किडनी योग्य प्रकारे गाळू शकत नाही. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी ते पिणे टाळावे.
advertisement
4/9
२) मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक? मधुमेह असलेल्या लोकांनी नारळपाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने आणि कर्बोदकांचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील साखर वाढू शकते.
advertisement
5/9
३) अॅलर्जी होऊ शकते? काही लोकांना नारळपाण्याने अॅलर्जी होऊ शकते. त्वचेवर खाज सुटणे, लालसर चट्टे येणे, सूज येणे यासारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब त्याचे सेवन थांबवा.
advertisement
6/9
४) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी टाळावे! उच्च रक्तदाबावर औषध घेत असलेल्या लोकांनी नारळपाणी पिताना काळजी घ्यावी. त्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांशी प्रतिक्रिया करून शरीराला त्रास देऊ शकते.
advertisement
7/9
५) सर्दी-खोकल्यावर परिणाम करू शकते? नारळपाणी शरीराला थंडावा देते. त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल, त्यांनी मर्यादित प्रमाणात नारळपाणी प्यावे किंवा पूर्णपणे टाळावे.
advertisement
8/9
नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे असले तरी, काही परिस्थितींमध्ये ते आरोग्यास हानीकारक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचे सेवन करा.
advertisement
9/9
(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Coconut Water Side Effects: 'नारळपाणी म्हणजे अमृत' हा गैरसमज, 'या' लोकांसाठी ठरू शकतं जिवघेणं