TRENDING:

Side Effects of Salt: जास्त मीठ खाणं देईल आजारांना निमंत्रण आजच कमी करा मीठाचं प्रमाण

Last Updated:
Side Effects of Salt : चवीने खाणार त्याला देव देणार अशी म्हण आपल्याकडे आहे. कोणताही पदार्थ हा मिठाशिवाय अळणीच. वाढत्या जीवनशैलीमुळे जेवणात मिठाचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे विविध आजारही वाढू लागले आहेत. अतिरिक्त मिठाचे दुष्परिणाम काय आहेत ते जाणून घेऊयात.
advertisement
1/7
Side Effects of Salt: चवीचा ‘हा’ पदार्थ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
आहारात प्रमाणापेक्षा जास्त मीठ वापरलं जात असेल तर ते पोटाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस होण्यास कारणीभूत ठरू शकतं.
advertisement
2/7
जर तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास असेल जास्त मीठ खाणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तदाब वाढतो.
advertisement
3/7
जास्त मीठ खाल्ल्याने किडनीवरही ताण पडतो आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
advertisement
4/7
जर तुम्हाला हृदरोग झाला असेल तर तुम्ही आहारातून मीठ कमी करायलाच हवं. कारण मिठाच्या अतिरिक्त सेवनाने हृदयाच्या समस्या वाढतात.
advertisement
5/7
जास्त मीठ खाल्ल्याने जास्त भूक लागते. त्यामुळे जास्त अन्नाचं सेवन केलं जातं जे वजन वाढायला कारणीभूत ठरतं.
advertisement
6/7
मिठाच्या अतिसेवनामुळे हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं. 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांची हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तिशीनंतर महिलांनी आहारात मीठ कमी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
7/7
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचण्याचं प्रमाण वाढतं परिणामी हातापायांवर सूज दिसून येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Side Effects of Salt: जास्त मीठ खाणं देईल आजारांना निमंत्रण आजच कमी करा मीठाचं प्रमाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल