TRENDING:

Guava Cleaing Tips : फक्त पाण्यामध्ये टाकून ठेवणं पुरेसं नाही; 'या' पद्धतीने धुवा पेरू, राहणार नाही कोणताच धोका

Last Updated:
How to clean guava completely : आपल्याकडे फळं बाजारातून आणली की ती आधी पाण्यात बुडवून ठेवली जातात. बरेच लोक यामध्ये मीठ किंवा व्हिनेगर टाकून ठेवतात, जेणेकरून कोणतेही हानिकारक जिवाणू असतील तर ते नष्ट होती. मात्र पेरू स्वच्छ करण्यासाठी केवळ इतकेच पुरेसे नाही. चला पाहूया योग्य पद्धत कोणती आहे.
advertisement
1/7
पाण्यामध्ये ठेवणं पुरेसं नाही; 'या' पद्धतीने धुवा पेरू, राहणार नाही कोणताच धोका
पेरू धुण्यासाठी ते फक्त पाण्यात बुडवून ठेवणं पुरेसं नसलं तरी ते धुणं फार काही अवघड नाही. आधी पेरू व्यवस्थित पाहा. त्यामध्ये कुठेही मार लागलेला आहे का? कुजलेले भाग किंवा बुरशी आहे का? हे तपासा. जर असे काही असेल तर तो भाग कापून टाका.
advertisement
2/7
पेरू पाण्यात बुडवून ठेवण्यापेक्षा तो वाहत्या थंड पाण्याखाली घर आणि हातांनी हळूवारपणे घासून घ्या. वाहत्या पाण्याखाली धुतल्याने पेरूवर चिकटलेले सर्व नकोसे अवशेष निघून जातात.
advertisement
3/7
पेरूचे कवच कडक असल्यास तुम्ही स्वच्छ ब्रशनेदेखील ते हलके घासू शकता. धुतल्यानंतर पेरू स्वच्छ कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून सुकवा. याने तुमचे पेरू एकदम खाण्यायोग्य बनतील.
advertisement
4/7
फळ पाण्यात ठेवण्याऐवजी ती वाहत्या पाण्याखाली धुणं जास्त फायदेशीर असतं. कारण यामुळे फळांवरचे कोणतेही अवशेष किंवा कीटकनाशक लगेच निघून जातात आणि आपल्या हातांवरही काही राहात नाही.
advertisement
5/7
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालानुसार, वाहत्या पाण्याखाली फळे आणि भाज्या धुतल्याने कीटकनाशकांचा संपर्क कमी होतो. ते पूर्णपणे निघत नाही. पण बर्याचनधी कमी होतात. कारण बऱ्याच कीटक नाशकांचे टॉलरन्स जास्त असते, म्हणजेच ते एका विशिष्ठ मर्यादेपर्यंत फळांवर राहतात.
advertisement
6/7
फळं कापण्यापूर्वी किंवा नंतर साबण आणि कोमट पाण्याने हात चांगले धुवा. यामुळे घाण आणि जंतूंचा प्रसार रोखता येईल. फळे भांड्यात बुडवण्याऐवजी वाहत्या पाण्याखाली चाळणीत किंवा हातात धरून धुवा. यामुळे वरवरचे कीटकनाशकांचे अवशेष कमी होतात.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Guava Cleaing Tips : फक्त पाण्यामध्ये टाकून ठेवणं पुरेसं नाही; 'या' पद्धतीने धुवा पेरू, राहणार नाही कोणताच धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल