Curd Benefits in Winter: हिवाळ्यात दही खायचं की नाही? खाल्लं तर फायदा होईल की नुकसान ?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of eating Curd in Winter: आयुर्वेदानुसार दही हे उष्ण प्रकृतीचं अन्न मानलं जातं. त्यामुळे हिवाळ्यात दही खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहायला मदत होते. याशिवाय दही है उत्तम आणि नैसर्गिक प्रो-बायोटीक आहे. ज्यामुळे हिवाळ्यात अन्न पचून पोटदुखीच्या विविध आजारांपासून आराम मिळतो. जाणून घेऊयात हिवाळ्यात दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
advertisement
1/9

दह्यात मोठ्या प्रमाणात प्रथिनं आणि कमी कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहून पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं. कॅलरी कमी असल्यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा नियंत्रणात ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी दही खाणं फायद्याचं ठरतं.
advertisement
2/9
हिवाळ्यात थंडीमुळे अनेकदा पचनक्रिया मंदावते पण दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी जळायला मदत होते.
advertisement
3/9
हिवाळ्यात दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय आतड्यांची जळजळही कमी व्हायला मदत होते.
advertisement
4/9
दही हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे. ज्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडं मजबूत व्हायला मदत होते. दह्याच्या नियमित सेवनाने ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. कॅल्शियम हे दातांच्या मजबुतीसाठी आणि संरक्षणासाठी फायदेशीर आहे.
advertisement
5/9
दह्याच्या सेवनामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. कारण दही हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर असतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
6/9
दह्यात असलेले चांगले बॅक्टेरिया मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. दह्यातल्या जीवाणूमुळे सेरोटोनिनचं उत्पादन वाढून तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतं. दही खाल्ल्याने मन स्थिर व्हायला मदत होते.
advertisement
7/9
हिवाळ्यात दही मध किंवा गुळासोबत खाल्ल्याने त्याचे फायदे वाढतात. त्यामुळे शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळून शरीर उबदार राहायला मदत होते.
advertisement
8/9
हिवाळ्यात दही खाणं फायद्याचं जरी असलं तरीही ते खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. फ्रिजमधून दही काढून ते लगेच खाऊ नका.यामुळे सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ शकतो. फ्रिजमधून दही काढल्यानंतर ते सर्वसामान्य तापमानाला आल्यावरच खा.
advertisement
9/9
ज्या लोकांना दमा, सायनस किंवा घशाचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात दही टाळावं अन्यथा त्यांच्या त्रासामध्ये वाढ होऊन नुकसान होण्याची भीती आहे. तरीही त्यांना दही आवडत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुपारच्या जेवणात ते दह्याचा समावेश करू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Curd Benefits in Winter: हिवाळ्यात दही खायचं की नाही? खाल्लं तर फायदा होईल की नुकसान ?