Surya Gochar 2026: विजया एकादशीला कुंभ संक्राती; सिंहसह या 5 राशींच्या आयुष्यात नवीन प्रकाश, नवपर्वास सुरुवात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sun Transit in Aquarius 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह येत्या शुक्रवारी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजून 8 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी विजया एकादशी असून सूर्य आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या घरात प्रवेश करेल, त्याठिकाणी आधीपासूनच राहू, बुध आणि शुक्र विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत आता चार ग्रहांची युती होत आहे. विजया एकादशीच्या दिवशीच कुंभ संक्रांतीचा हा दुर्मिळ योगायोग एकूण 5 राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
advertisement
1/5

वृषभ - सूर्य तुमच्या राशीच्या 10 व्या घरात जाणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी ही एक नवी सुरुवात असेल. आतापर्यंत जे काही टेन्शन होतं, ते आता कमी व्हायला सुरुवात होईल. ज्यांना लग्न करायचं आहे, त्यांच्यासाठी हा काळ एकदम भारी आहे. तुम्हाला वडील किंवा घरातल्या मोठ्या माणसांकडून चांगली मदत मिळेल. सासरच्या लोकांशी आणि जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील. तुमचं बोलणं आता लोकांवर छाप पाडणारं आणि आत्मविश्वासाचं असेल.
advertisement
2/5
कर्क - सूर्य तुमच्या राशीतून 8 व्या घरात जाणार आहे. या बदलामुळे कर्क राशीच्या लोकांची रखडलेली कामं आता पटापट मार्गी लागतील. नोकरीत कटकटी होत्या, त्यातून सुटका मिळेल. पती-पत्नीला एकमेकांसोबत छान वेळ घालवता येईल. जर स्वतःचा काही धंदा सुरू करायचा विचार असेल, तर हा काळ फायदेशीर ठरेल. घरच्यांच्या आरोग्याची चिंता आता मिटेल आणि घरातलं वातावरण एकदम आनंदी राहील.
advertisement
3/5
सिंह - सूर्य तुमच्या राशीतून 7 व्या घरात जाणार असून तो तुमच्या राशीचा मालक आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे जणू चमत्कारच असेल. तुमच्या हिमतीत आणि ताकदीत वाढ होईल. तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि हुशारीने समोरच्याला आपलंसं कराल. पैसे येण्याचे नवीन मार्ग सापडल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगती होईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये काम सुरू करण्यासाठी किंवा नवीन बिझनेस पार्टनर शोधण्यासाठी हीच ती वेळ आहे.
advertisement
4/5
वृश्चिक - सूर्य तुमच्या राशीतून 5 व्या घरात जाणार आहे. तुमच्या करिअर, व्यवसाय आणि लोकांसमोरच्या इमेजसाठी हा काळ खूप चांगले रिझल्ट देणारा ठरेल. तुमचं बोलणं इतकं प्रभावी असेल की तुम्ही तुमची अर्धवट कामं पूर्ण करून घ्याल. मोठ्या आणि वजनदार लोकांशी तुमची ओळख वाढेल. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एखादी गोड बातमी मिळू शकते. परीक्षेत काय होईल याची चिंता सोडून द्या, नशीब तुमच्या बाजूने आहे.
advertisement
5/5
धनू - सूर्य तुमच्या राशीतून 4 व्या घरात जाणार आहे. या काळात धनु राशीच्या लोकांच्या कामात मोठी प्रगती दिसेल. जे खूप दिवसांपासून बेरोजगार आहेत, त्यांना मनासारखी नोकरी मिळण्याची संधी आहे. तुमचं करिअर सध्या एकदम सेट आहे आणि परीक्षेतही तुम्ही बाजी माराल. जर तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष दिलं आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला, तर तुम्ही आयुष्यात खूप मोठे आणि योग्य निर्णय घेऊ शकाल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Gochar 2026: विजया एकादशीला कुंभ संक्राती; सिंहसह या 5 राशींच्या आयुष्यात नवीन प्रकाश, नवपर्वास सुरुवात