Diabetes Tips : रक्तातील जेवनापूर्वीची साखर किती असावी? वयानुसार बदलते प्रमाण, पाहा चार्ट
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Blood Sugar Age Chart: भारतात सुमारे 100 दशलक्ष लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. असे एका अहवालात दिलेले आहे. 15 कोटी लोक प्री-डायबेटिसने ग्रस्त आहेत. परंतु, त्यापैकी अनेकांना या आजाराची माहितीही नाही. डॉक्टरांच्या मते, तुमची शुगर लेव्हल नॉर्मल आहे की जास्त हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी घरी तपासू शकता. जाणून घ्या या विशेष चार्टवरून.
advertisement
1/15

मधुमेह हा सध्या साथीच्या रोगासारखा पसरत आहे. जगभरात लाखो लोक त्याचे बळी आहेत. चिंतेची बाब म्हणजे, मोठ्या संख्येने लोक प्री-डायबिटीसने ग्रस्त आहेत. परंतु अद्याप त्याबद्दल माहिती नाही. एका चार्टवरून जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
advertisement
2/15
वयानुसार साखरेची पातळी किती असावी? 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी जेवल्यानंतर एक किंवा दोन तासांनी रक्तातील साखरेची पातळी 140 mg/dL असावी. जेवनापूर्वीची साखर म्हणजेच फास्टिंग शुगर 99 mg/dL असावी.
advertisement
3/15
40 ते 50 वयोगटातील लोक आणि <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/diabetes-tips-watermelon-can-be-very-dangerous-for-diabetics-avoid-this-mistake-while-eating-it-mhpj-1156737.html">मधुमेहाच्या</a> रुग्णांमध्ये फास्टिंग शुगर 90 ते 130 mg/dL असावी. जेवणानंतर 140 mg/dL आणि रात्रीच्या जेवणानंतर 150 पेक्षा कमी सामान्य मानले जाते. त्यापेक्षा जास्त असेल तर ती चिंतेची बाब आहे.
advertisement
4/15
प्रौढ व्यक्तीसाठी सामान्य <a href="https://news18marathi.com/lifestyle/health-tips-keep-this-food-in-your-diet-to-bp-sugar-and-reduce-weight-mhpj-1148106.html">फास्टिंग शुगर</a> अंदाजे 60 mg/dL ते 100 mg/dL असावी. जेवणानंतर 2 तासांनी 120 ते 140 mg/dL रक्तातील साखरेची पातळी सामान्य मानली जाते.
advertisement
5/15
डॉ. दिनेश कुमार त्यागी यांनी सांगितले, <a href="https://news18marathi.com/lifestyle/diabetes-tips-grind-these-seeds-with-wheat-and-eat-that-chapati-to-control-diabetes-gh-mhpj-1145260.html">मधुमेह</a> हा एक गंभीर आजार आहे. जेव्हा लोकांना या आजाराचे निदान होते, तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचारांची गरज असते. त्याचोसोबत संतुलित आहार, व्यायाम आणि चांगल्या जीवनशैलीचीही.
advertisement
6/15
मधुमेह केवळ उपचारानेच नियंत्रित केला जाऊ शकतो आणि तो कायमचा बरा होऊ शकत नाही. या परिस्थितीत रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आणि वेळोवेळी तपासणे सर्वात महत्वाचे आहे.
advertisement
7/15
प्री-डायबिटीज असलेले लोक त्यांना हवे असल्यास ते नियंत्रित करू शकतात. परंतु प्रत्येकाला मानवी रक्तातील साखरेच्या पातळीबद्दल मूलभूत माहिती माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरुन घरी देखील त्याचे परीक्षण केले जाऊ शकते.
advertisement
8/15
डॉ. दिनेश कुमार त्यागी यांच्यानुसार रक्तातील साखरेची सामान्य श्रेणी काय आहे, रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर 2 तासांनी रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. साधारणपणे, फास्टिंग शुगर 60 mg/dL आणि 100 mg/dL च्या दरम्यान असावी.
advertisement
9/15
जेवल्यानंतर 2 तासांनी रक्तातील साखर 120 ते 140 mg/dL असावी. जेवणानंतर ही साखरेची सामान्य पातळी मानली जाते. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी या मर्यादेत असल्यास तुम्ही निरोगी आहात आणि मधुमेहाचा धोका नाही. परंतु त्यापेक्षा जास्त असल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
10/15
तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी जेवणापूर्वी 100-124 mg/dL आणि जेवणानंतरची साखरेची पातळी 140-160 mg/dL असेल तर ते प्री-डायबेटिक म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.
advertisement
11/15
याचा अर्थ त्या व्यक्तीच्या रक्तातील साखर सामान्यपेक्षा जास्त आहे. परंतु त्याला मधुमेह नाही. प्री-डायबेटिस नियमित औषधोपचार आणि योग्य आहाराने सामान्य होऊ शकतो. प्री-डायबेटिस असलेल्या रुग्णांची HbA1C चाचणी होऊ शकते. ही चाचणी गेल्या 3 महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते. जर HbA1C चाचणीचा निकाल 5.7 आणि 6.4 च्या दरम्यान असेल, तर प्री-डायबेटिसची पुष्टी केली जाते.
advertisement
12/15
मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी किती असते. डॉक्टरांच्या मते, जेव्हा रक्तातील फास्टिंग शुगरचे प्रमाण 125 mg/dL पेक्षा जास्त असते आणि जेवल्यानंतर 2 तासांनी साखर 160 mg/dL किंवा त्याहून अधिक होते, तेव्हा ते मधुमेहाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार करा.
advertisement
13/15
मधुमेहाची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या करू शकतात आणि त्यांच्या परिणामांवर आधारित निश्चितपणे मधुमेहाचे निदान केले जाते. मधुमेहाची पुष्टी करण्यासाठी HbA1C चाचणी केली जाते.
advertisement
14/15
या चाचणीचा निकाल 6.5 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास मधुमेहाची पुष्टी होते. अशा रुग्णांना मधुमेहाची औषधे घ्यावी लागतात. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासली पाहिजे.
advertisement
15/15
(या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सदरील बातमीतील मतांशी न्यूज18 मराठी सहमत नसून जबाबदार नसेल)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diabetes Tips : रक्तातील जेवनापूर्वीची साखर किती असावी? वयानुसार बदलते प्रमाण, पाहा चार्ट