TRENDING:

Identify Herbal Color : होळीचे रंग खरेदी करायला जाताय? 'या' गोष्टी तपासा, नाहीतर घेऊन याल केमिकलने भरलेला कलर

Last Updated:
Difference Between Herbal And Synthetic Colors : होळी आता जवळ आली आहे. या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहता. लहान मुलं असो की वयस्कर आजी-आजोबा, सर्वांना या उत्सवाची ओढ असते. म्हणून आता बाजारात रंगही मिळत आहेत. पण हे रंग खरंच हर्बल आहेत की केमिकलयुक्त हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे.
advertisement
1/7
होळीचे रंग खरेदी करायचेत? 'या' गोष्टी तपासा, नाहीतर घेऊन याल केमिकलने भरलेला कलर
हल्ली बहुतांश लोक हर्बल किंवा नैसर्गिक रंग खरेदी करतात, जेणेकरून त्या रंगांमुळे कोणालाही इजा होऊ नये. पण जशी बाजारात इतर पदार्थांमध्ये भेसळ होते तसेच रंगही केमिकलयुक्त असू शकतात. म्हणूनच चांगले रंग कसे ओळखायचे यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
advertisement
2/7
सर्वात आधी रंगांची चमक तपासा. तुम्ही रंग खरेदी करत असाल आणि त्यात जास्त चमक किंवा लहान चमकी दिसत असेल तर सावधगिरी बाळगा. नैसर्गिक रंग चमकत नाहीत. जर रंग खूप चमकदार असेल तर त्यात काचेची पावडर किंवा अॅल्युमिनियम पावडर असू शकते, ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
advertisement
3/7
रांगणाचा सुगंधही ओळखा. नैसर्गिक रंगाला एकतर सुगंध नसतो किंवा सौम्य फुलांचा आणि हर्बल सुगंध असतो. जर रंगाला रॉकेल, पेट्रोल किंवा कोणत्याही तीव्र रसायनासारखा वास येत असेल तर तो कदाचित कृत्रिम आहे. असे रंग वापरल्याने फुफ्फुस आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
4/7
पाण्यात विरघळवूनही तुम्ही रंगांची शुद्धता तपासू शकता. एक ग्लास पाण्यात थोड्या प्रमाणात रंग विरघळवा. जर रंग पाण्यात पूर्णपणे विरघळत नसेल आणि तळाशी जड अवशेष राहात असतील तर त्यात जड धातू किंवा वाळू असण्याची शक्यता आहे. तसेच पाण्यात बुडवल्यावर रंग खूप गडद आणि अपारदर्शक झाला तर त्यात कृत्रिम रंग असण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
हातावर घासूनही तपासू शकता. तुमच्या बोटांमध्ये थोडासा रंग घ्या आणि तो घासून पाहा. नैसर्गिक रंग मऊ असतो. जसे मैदा किंवा पावडर. रासायनिक रंग मात्र दाणेदार आणि खडबडीत असतात. घासल्यानंतर जर तुम्हाला जळजळ किंवा खाज येत असेल तर असे रंग अजिबात खरेदी करू नका.
advertisement
6/7
गडद आणि निऑन रंग टाळा. कारण रासायनिक रंग बहुतेकदा खूप गडद आणि फ्लोरोसेंट असतात. जसे की, निऑन हिरवा किंवा गडद जांभळा रंग. नैसर्गिक रंग हलके आणि अधिक मॅट दिसतात. जर रंग धुतल्यानंतर सहज निघत नसेल तर ते शुद्ध नसण्याची शक्यता असते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Identify Herbal Color : होळीचे रंग खरेदी करायला जाताय? 'या' गोष्टी तपासा, नाहीतर घेऊन याल केमिकलने भरलेला कलर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल