TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, ठाण्याचा पारा चढला, कल्याण-डोंबिवलीला 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
महाराष्ट्रात वारं फिरलं, ठाण्याचा पारा चढला, कल्याण-डोंबिवलीला 24 तास अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात महिना अखेरीस पुन्हा बदल जाणवत आहेत. काही दिवसांपासून कोरडे, उष्ण व सूर्यप्रकाशित असलेले हवामान बदलले असून आता ढगाळ, दमट आणि उष्ण जाणवेल. ऋतुबदलामुळे उष्णता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. अशातच राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिला आहे. 24 फेब्रुवारीचं ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपासून स्थिर असलेले हवामान आज उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35-37 अंश तर किमान तापमान स्थिर असून 25 अंश सेल्सिअस राहील. रात्रीच्या वेळी वातावरण सुखावह असेल, दिवसभर कडक ऊन आणि उकाडा जाणवेल. त्यामुळे कामानिमित्त दुपारी घरा बाहेर पडताना छत्री किंवा कॉटन कपड्यांचा वापर करावा.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. कमाल व किमान तापमान वाढ होऊन 38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. उन्हाचा चटका वाढत असल्याने दुपारी शक्यतो बाहेर पडणे टाळावे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण, कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस तापमानात अधिक वाढ होणार असून, किमान तापमान 19 अंश तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस कडक ऊन असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अधिक जाणवतील.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. मुरबाड व शहापूर तालुक्यातील हवामान एक अंकी असल्याने स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, ठाण्याचा पारा चढला, कल्याण-डोंबिवलीला 24 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल