TRENDING:

Food Business: फक्त हाताला चव पाहिजे! गावात पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल, पण इथला पेढा खाण्यासाठी गर्दी

Last Updated:
Food Business: हाताला चव असली की लोकं शोधत तुमच्याकडे येतात. सोलपुरातील एका गावात असणाऱ्या पेढ्यावाल्याच्या बाबतीत हे खरं ठरलंय.
advertisement
1/7
फक्त हाताला चव पाहिजे! पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल, पण इथला पेढा खाण्यासाठी गर्दी
प्रत्येक शहरात खवय्यांची आवडती काही ठिकाणं असतात. तिथं नेहमीच गर्दी पडलेली असते. पण एखाद्या गावात साध्या पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल असून तिथं देखील मोठी गर्दी होतेय, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती गावात मात्र हे घडतंय. 59 वर्षीय सुरेश वाकडे यांच्या हातचा पेढा खाण्यासाठी इथं नेहमीच गर्दी असते.
advertisement
2/7
मुस्ती येथील 59 वर्षीय सुरेश वाकडे हे 1995 पासून गावातच बसवेश्वर या नावाने हॉटेल चालवतात. या लहानशा हॉटेलमध्ये त्यांनी बनवलेला पेढा चांगलाच फेमस झाला आहे. विशेष म्हणजे हा गावचा पेढा खाण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी लोक आवर्जून येतात. रोज 35-40 लिटर दुधाचा पेढा बनवतो. पण काही तासातच तो संपतो, असं सुरेश सांगतात.
advertisement
3/7
रोज सकाळी म्हशीचे 35 ते 40 लिटर दूध आणून हॉटेलमध्ये पेढा बनवला जातो. दुधाला जवळपास तीन ते चार तास उकळून त्यामध्ये साखर घातली जाते. जवळपास 35 ते 40 लिटर दुधापासून 7 ते 8 किलो पेढा तयार होतो. एका पेढ्याची किंमत 20 रुपये इतकी आहे. तर 400 रुपये किलो दराने हा पेढा विक्री केला जातो.
advertisement
4/7
सुरेश वाकडे यांनी तयार केलेले पेढे गावातील हॉटेलमधूनच विकले जातात. मागणी चांगली असल्याने सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या आतच पेढा संपून जातो.
advertisement
5/7
सुरेश यांना पेढे विक्रीतून सर्व खर्च वजा करून महिन्याला 30 ते 40 हजार रुपयापर्यंत नफा मिळतो. तर वर्षाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या व्यवसायात दोघे कामगार देखील मदत करतात. त्याचंही कुटूंब याच व्यवसायवर चालतं, असं वाकडे सांगतात.
advertisement
6/7
सुरेश वाकडे यांच्या बसवेश्वर हॉटेलमध्ये चहा, चुरमुरे पासून बनवलेला चिवडा, कांदा भजी, मिरची भजी देखील खाण्यासाठी उपलब्ध आहे.
advertisement
7/7
सुरेश यांचा पेढा खाण्यासाठी बोरामणी, कुंभारी, तांदूळवाडी, निलेगाव तसेच धाराशिव, तुळजापूर, लातूर, मुंबई पुणे येथून सुद्धा ग्राहक येत असतात. लोकांना खाण्यासाठी दर्जेदार क्वालिटी दिली तर लोक आपल्याला शोधून येतात, असं ते सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Food Business: फक्त हाताला चव पाहिजे! गावात पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल, पण इथला पेढा खाण्यासाठी गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल