अरुंधतीच्या लाडक्या लेकीचं ठरलं! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात, रोमँटीक फोटो समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Aai Kuthe Kay Karte Actress Wedding : आई कुठे काय करते मालिकेतील ईशा खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार आहे. तिने नुकतीच तिच्या प्रेमाची कबूली देत रोमँटीक फोटो शेअर केलेत.
advertisement
1/8

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते. मालिका संपली असली तरी मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक आजही तितकंच प्रेम करतात. मालिकेतील अरुंधतीची लाडकी लेक म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे.
advertisement
2/8
अरुंधतीची लेक आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अपूर्वा गोरेनं तिच्या प्रेमाची कबूली देत थेट साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत.
advertisement
3/8
अभिनेत्री अपूर्वा गोरेचा नुकताच साखरपुडा नुकताच पार पडला असून ती लग्नबंधनात अडकणार आहे. अपूर्वाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमँटीक फोटो शेअर केलेत. ही बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांपासून ते सेलिब्रिटी मित्रांपर्यंत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
advertisement
4/8
अपूर्वाने सोशल मीडियावर काही रोमँटिक फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली. "चाफा आणि तो…. मला खुप आवडतात… #ठरलं" असं कॅप्शन देत अपूर्वाने दोघांचे रोमँटीक फोटो शेअर केलेत.
advertisement
5/8
अपूर्वाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा स्पष्ट दाखवलेला नाही. एका फोटोमध्ये त्याचा पाठमोरा फोटो दिसतो. त्यामुळे तिचा जोडीदार नेमका कोण आहे? तो इंडस्ट्रीतील आहे का बाहेरील? याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
advertisement
6/8
अपूर्वाने ही आनंदाची बातमी शेअर करताच तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. सहकलाकार, मित्रमंडळी आणि चाहत्यांनी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
7/8
अपूर्वाने अजून लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही पण तिचे चाहते तिचा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मालिकेत ईशाचं लग्न अनिशबरोबर झालं होतं. आता अपूर्वाच्या आयुष्यातील खरा अनिश कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
advertisement
8/8
अपूर्वाच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास ती आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्याआधी तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते मालिकेत तिनं अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अरुंधतीच्या लाडक्या लेकीचं ठरलं! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात, रोमँटीक फोटो समोर