TRENDING:

चुकीला माफी नाही! मुंबईत अवैध पार्किंग महागात पडणार, थेट FIR दाखल होणार, पाहा नवे नियम

Last Updated:

Mumbai News: महापालिकेचा हा निर्णय प्रभावीपणे राबवला गेला तर मुंबईतील अग्निसुरक्षा अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईतील अरुंद गल्ल्या, दाट वस्ती आणि रस्त्यांच्या दुतर्फा होणारे बेकायदा पार्किंग हे अग्निशमन दलासाठी मोठे आव्हान ठरत आहे. अनेक वेळा आगीच्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन गाड्यांना उशीर होत असून, त्यामुळे जीवित व मालमत्तेचे मोठे नुकसान होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर पाऊल उचलत बचावकार्यात अडथळा ठरणाऱ्या वाहनधारकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
चुकीला माफी नाही! मुंबईत अवैध पार्किंग महागात पडणार, थेट FIR दाखल होणार, पाहा नवे नियम
चुकीला माफी नाही! मुंबईत अवैध पार्किंग महागात पडणार, थेट FIR दाखल होणार, पाहा नवे नियम
advertisement

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी (ता. 2) प्रशासनाला स्पष्ट आदेश देत सांगितले की, “अग्निशमन दलाच्या वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बेकायदा पार्किंगप्रकरणी संबंधित वाहनचालकांवर एफआयआर नोंदवण्यात यावी. हा निर्णय शहरातील वाढत्या अग्निसुरक्षेच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला आहे.”

मुंबईकरांचा वेळ वाचणार, इथं होतोय वांद्रे-वरळी सी लिंकसारखा ब्रिज, डेडलाईन ठरली!

advertisement

मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले की, “नागरिकांकडून जर अनधिकृत पार्किंगबाबत तक्रार प्राप्त झाली तर ती तक्रार तातडीने संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येईल. या प्रक्रियेमुळे तक्रारींवर जलद कारवाई होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य अधिक सुसूत्रपणे पार पाडता येईल.”

माजी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण कदम यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “हा नियम केवळ कागदावर न राहता कोणत्याही दबावाशिवाय आणि सातत्याने अंमलात आणणे गरजेचे आहे. तसेच उंच इमारती, टॉवर परवानग्या आणि अग्निसुरक्षेच्या नियमांबाबतही महापालिकेने अधिक कठोर भूमिका घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.”

advertisement

महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे माजी संचालक एम. व्ही. देशमुख यांनीही या निर्णयाला पाठिंबा देत केवळ बेकायदा पार्किंगच नव्हे, तर व्हीआयपी वाहनांमुळे होणारे अडथळे, अनधिकृत बांधकामे आणि नियमांना बगल देऊन उभ्या राहिलेल्या उंच इमारती यांचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, महापालिकेचा हा निर्णय प्रभावीपणे राबवला गेला तर मुंबईतील अग्निसुरक्षा अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
चुकीला माफी नाही! मुंबईत अवैध पार्किंग महागात पडणार, थेट FIR दाखल होणार, पाहा नवे नियम
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल