advertisement

मुंबईत मध्यरात्री ड्रेनेजनं घेतला मजुराचा जीव, सफाई दरम्यान गुदमरुन मृत्यू

Last Updated:

मुंबईच्या गोरेगाव मेगा मॉलजवळ ड्रेनेज सफाईदरम्यान दोन मजूर गुदमरले, एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. सुरक्षा तपासणीची चौकशी सुरू.

AI Image- ड्रेनेज साफसफाई करताना -
AI Image- ड्रेनेज साफसफाई करताना -
मुंबई कुणालाच उपाशी ठेवत नाही, तिला मायानगरी म्हणतात, या मायानगरीत पोट भरण्यासाठी मजुरी करणाऱ्या मजुराचा मात्र गुदमरुन मृत्यू झाला आहे. मुंबईच्या झगमगाटात आणि वेगात पुन्हा एकदा एका मजुराचा श्वास कोंडून मृत्यू झाला. ज्यावेळी संपूर्ण शहर गाढ झोपेत होतं, तेव्हा स्वतःचा जीव मुठीत धरून मुंबईच्या ड्रेनेजची घाण साफ करणाऱ्या दोन मजुरांवर काळाने झडप घातली. यात एकाचा दुर्दैवी अंत झाला असून, दुसऱ्याचा श्वास वाचवण्यासाठी सध्या डॉक्टरांची झुंज सुरू आहे.
ड्रेनेज सफाईच्या कामात होणाऱ्या मजुरांच्या मृत्यूची मालिका अद्याप थांबलेली नाही. गोरेगाव येथील मेगा मॉल परिसरात मंगळवारी मध्यरात्री ड्रेनेज साफ करत असताना दोन मजूर गुदमरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या मजुराची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना गोरेगाव पश्चिम येथील मेगा मॉलजवळ मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास घडली. एका खासगी कंपनीने ड्रेनेज सफाईचे काम हाती घेतले होते. कामाचा भाग म्हणून दोन मजूर ड्रेनेजमध्ये उतरले होते. मात्र, आतमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे या दोन्ही मजुरांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि ते तिथेच गुदमरले.
advertisement
एकाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच दोघांनाही बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने एका मजुराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दुसऱ्या मजुराला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हे दोन्ही मजूर एका खासगी कंत्राटदाराकडे काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ड्रेनेजमध्ये उतरण्यापूर्वी त्यांना आवश्यक सुरक्षा साधने दिली होती का? विषारी वायूचा धोका तपासला होता का? याची चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत मध्यरात्री ड्रेनेजनं घेतला मजुराचा जीव, सफाई दरम्यान गुदमरुन मृत्यू
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement