TRENDING:

Daal : कोणती डाळ किती वेळ भिजवायची? फक्त लवकर शिजण्यासाठी नाही, आरोग्याशीही कनेक्शन

Last Updated:
How To Make Daal Cooking Tips : सामान्यपणे बहुतेक लोक कडधान्यं भिजवतात, काही मोजके लोक डाळी भिजवतात. यामागील हेतू फक्त ते लवकर शिजणं असतं. पण याचा संबंध तुमच्या आरोग्याशीही आहे. याबाबत न्यूट्रिशनिस्टने माहिती दिली आहे.
advertisement
1/5
कोणती डाळ किती वेळ भिजवायची? फक्त लवकर शिजण्यासाठी नाही, आरोग्याशीही कनेक्शन
सामान्यपणे आपण कडधान्यं का भिजत घालतो तर ते लवकर शिजावेत, गॅसची बचत व्हावी म्हणून. डाळी म्हणाल तर बहुतेक लोक डाळी थेट कुकरला लावून किंवा भांड्यात शिजवून घेतात आणि मग त्याला फोडणी देतात. पण काही मोजके लोक डाळीही भिजवून शिजवतात.
advertisement
2/5
आता तुम्ही म्हणाल डाळी तर लगेच शिजतात, मग ते भिजवण्याची काय गरज. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल डाळी असो वा इतर कडधान्य ती भिजवण्यामागे फक्त ते लवकर शिजणं इतकंच कारण नाही तर त्याचा संबंध तुमच्या आरोग्याशीही आहे.
advertisement
3/5
डाळ, कडधान्य भिजवण्याचीही एक विशिष्ट वेळ असते. प्रत्येक डाळ, कडधान्यांची भिजवण्याची वेळ वेगवेगळी असते. यामुळे त्यातील पोषक घटक शरीराला मिळतात. शिवाय त्यामुळे होणारा गॅस, अपचनासारखा त्रासही उद्भवत नाही.
advertisement
4/5
सालीशिवाय डाळी जशी मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ कमीत कमी 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास भिजवा. पण चणा डाळ जे कडक असते त्यामुळे ती 2-4 तास भिजवा तसंच ज्या डाळींना साली आहेत त्या कमीत कमी 2-4 तास भिजवा, ज्यामुळे त्यातील फायबर सॉफ्ट होतील.
advertisement
5/5
डाळीचे पूर्ण कडधान्य म्हणजे अख्खी मूग, अख्खा मसूर, अख्का तूर याला कोटिन असतं, त्यामुळे ते कमीत कमी 6-8 तास तरी भिजवायला हवेत. तर चणे, राजमा, छोले यासारखी कडधान्ये रात्रभर भिजत ठेवा. पण यात एक तमालपत्र, एक मोठी वेलची आणि एक लवंग टाका, असा सल्ला न्यूट्रिशनिस्ट लीला महाजन यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Daal : कोणती डाळ किती वेळ भिजवायची? फक्त लवकर शिजण्यासाठी नाही, आरोग्याशीही कनेक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल