TRENDING:

मुंबईत दाबेली खावी तर इथंच! तब्बल 20 हून अधिक प्रकार, तुम्ही ट्राय केलेत का?

Last Updated:
Mumbai Food: मुंबईत खवय्यांची अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत. मालाडमधील दाबेली 25 वर्षांपासून प्रसिद्ध आहे.
advertisement
1/5
मुंबईत दाबेली खावी तर इथंच! तब्बल 20 हून अधिक प्रकार, तुम्ही ट्राय केलेत का?
मुंबईत खाद्यप्रेमींची अनेक आवडती ठिकाणे आहेत. माटुंगा आणि खवय्यांचं एक अनोखं नातं आहे. त्यात अनेक खवय्यांना दाबेलीचे अनेक प्रकार खायला खूप आवडतात. तुम्हालाही दाबेलीचे खूप प्रकार खायला आवडत असतील तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे
advertisement
2/5
माटुंगा स्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या माटुंगा दाबेली या दुकानात तुम्हाला दाबेलीचे 20 हून अधिक प्रकार मिळतील.
advertisement
3/5
यामध्ये साधी दाबेली, बटर दाबेली, चीज दाबेली, चीज गार्लिक दाबेली, शेवपुरी दाबेली, गडबड दाबेली, ओव्हरलोड चीज दाबेली, ओवरलोड चीज गार्लिक दाबेली, चीज शेवपुरी दाबेली या सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. या सगळ्या दाबेलींची किंमत फक्त 30 ते 40 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
4/5
माटुंगा दाबेली या नावामुळेच अनेक जण इथे दाबेली खायला येतात. गेले 24 वर्ष ही दाबेली मुंबईमध्ये फेमस आहे. 2001 साली माटुंगा दाबेलीची सुरुवात झाली. तेव्हा फक्त साधा दाबेली आणि बटर दाबेली या दोनच प्रकारच्या दाबेली इथे मिळत होत्या.हळूहळू खवय्यांचा प्रतिसाद म्हणून इतरही सगळ्या गोष्टींची सुरुवात इथे झाली. एका छोट्या हात गाडीवर सुरू झालेला हा व्यवसाय आता मोठा झाला आहे.
advertisement
5/5
“2001 मध्ये मी आणि माझ्या वडिलांनी या दुकानाची सुरुवात केली. त्यावेळेस आमची दाबेली इतकी प्रसिद्ध होईल, असे आम्हाला कधीच वाटलं नव्हते हे सगळे खवय्यांचे आणि माटुंगाकरांचे प्रेम आहे,”असे माटुंगा दाबेलीचे व्यावसायिक किर्ती सोनी यांनी सांगितले. (साक्षी पाटील, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मुंबईत दाबेली खावी तर इथंच! तब्बल 20 हून अधिक प्रकार, तुम्ही ट्राय केलेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल