Instant Breakfast Recipe : गॅस सुरु न करता नाश्त्यात बनवू शकता 'हे' 9 पदार्थ! बनवायला जास्त वेळही लागत नाही..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Make these 9 dishes for breakfast without gas : तुम्हाला सकाळी सकाळी कमी वेळेत काहीतरी हेल्दी खायचं असेल आणि त्यासाठी कुकिंग करण्याची किंवा गॅस सुरु करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही हे काही पदार्थ बनवू शकता. हे कमी वेळेत बनतात आणि यासाठी जास्त लागत नाही.
advertisement
1/11

आपल्याला सकाळच्या वेळेत काहीतरी हेल्दी आणि टेस्टी हवं असतं. अशावेळी हे पदार्थ तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. हे पदार्थ तुमच्या पोटासाठी हाकले आहेत, मात्र तुम्हाला दिवसभर एनर्जी देऊ शकतात.
advertisement
2/11
फ्रुट सॅलड : याच्या नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्रुट्स कट करून एक बाऊल बनवू शकता. हवे असल्यास तुम्ही एखादे सॅलड ड्रेसिंग तयार करून यावर टाकू शकता.
advertisement
3/11
ओट्स दही बाउल : यासाठी रात्री भिजवलेले ओट्स घ्या त्यामध्ये दही आणि तुम्हाला आवडतात त्या इतर कच्च्या खाता येणाऱ्या भाज्या टाका. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ टाकून तयार करा. हवं असल्यास तुम्ही याला तडका देखील देऊ शकता.
advertisement
4/11
स्प्राऊट्स सॅलड : सर्व मोड आलेली कडधान्य एकत्र करा. त्यावर तुम्हाला हवे सॅलड ड्रेसिंग किंवा दही टाकूनही तुम्ही हे खाऊ शकता. आवडीनुसार तिखट मीठ अड्जस्ट करा आणि तुमचं स्प्राऊट्स सॅलड तयार होईल
advertisement
5/11
पीनट बटर ब्रेड : ब्रेडवर पीनट बटर लावून तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता. हा एक उत्तम प्रोटीन रिच नाश्ता तयार होतो. हवं असल्यास तुम्ही यामध्ये केळीचे तुकडे करूनही टाकू शकता.
advertisement
6/11
काकडी टोमॅटो सँडविच : जसे पण नेहमीच सँडविचेस बनवतो त्याप्रमाणे ब्रेडवर हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, कांदा, काकडी टोमॅटो टाकून हे सॅन्डविच बनेल. तुम्ही याला न भाजता खाऊ शकता.
advertisement
7/11
कॉर्न सॅलड : स्प्राऊट्स आणि फ्रुट सॅलॅडप्रमाणेच तुम्ही कॉर्नचे सॅलड बनवू शकता. यामध्ये तुम्हाला में हिरो कॉर्न म्हणजेच मधुमक्काचे दाणे असतील. यासोबत तुम्ही हव्या त्या भाज्या आणि सॅलड ड्रेसिंग टाकून एन्जॉय करू शकता.
advertisement
8/11
चिया सीड्स पुडिंग : यासाठी तुम्हाला भिजवलेले चिया सीड्स लागतील. यामध्ये तुम्ही कोणत्याही पत्रकाराचे दूध, फळं आणि हवं असल्यास मध टाकून हे पुडिंग तयार करू शकता.
advertisement
9/11
ड्राय फ्रुटस अँड योगर्ट बाउल : यासाठी दही फेटून घ्या आणि त्यामध्ये मध, वेलची पूड, चिरलेले काजू, बदाम, पिस्ता किंवा तुमच्या आवडीचा सुका मेवा टाकून एकत्र करा. तुमचा नाश्ता तयार होईल.
advertisement
10/11
स्मूदी बाऊल : ताजी किंवा फ्रोझन फळं, दूध आणि नट बटर ब्लेंड करून घ्या. तुम्हाला जसे हवे तसे घट्ट-पातळ करण्यासाठी तुम्ही दुधाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. ही स्मूदी चिरलेली फळं, ग्रॅनोला आणि चिया सीड्स टाकून सर्व्ह करा.
advertisement
11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Instant Breakfast Recipe : गॅस सुरु न करता नाश्त्यात बनवू शकता 'हे' 9 पदार्थ! बनवायला जास्त वेळही लागत नाही..