TRENDING:

तुम्हीसुद्धा हे पेनकिलर घेताय तर सावधान! मृत्यूचा धोका; केंद्र सरकारचा ALERT

Last Updated:
भारतातील बरेच लोक वेदनांसाठी हे पेनकिलर सर्रासपणे वापरतात.
advertisement
1/7
तुम्हीसुद्धा हे पेनकिलर घेताय तर सावधान! मृत्यूचा धोका; केंद्र सरकारचा Alert
डोकं दुखलं, अंग दुखलं की लोक सामान्य समजून डॉक्टरांकडे जाण्याऐवजी मेडिकलमधून पेनकिलर आणतात आणि ते घेतात. त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. पण अशाच एका पेनकिलरबाबत आता केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. हे पेनकिलर जीवघेणंही ठरू शकतं.
advertisement
2/7
फार्मा मानक संस्था इंडियन फार्माकोपिया कमिशन ने (IPC) डॉक्टर आणि रुग्णांसाठी मेफेनॅमिक अॅसिडच्या वापराबाबत औषध सुरक्षा सतर्कता जारी केली आहे.
advertisement
3/7
सामान्यतः वापरले जाणारे वेदनाशामक औषध Meftal या ब्रँड नावानं विकलं जातं. शीर्ष ब्रँड्समध्ये ब्लू क्रॉस लॅबोरेटरीजचा मेफ्टल, मॅनकाइंड फार्माचा मेफकाइंड पी, फायझरचा पॉन्स्टन, सीरम इन्स्टिट्यूटचा मेफनॉर्म आणि डॉ. रेड्डीज इबुकलिन पी यांचा समावेश आहे.
advertisement
4/7
फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PVPI), जे औषध उत्पादनांशी संबंधित प्रतिकूल औषध प्रतिक्रिया (ADRs) आणि प्रतिकूल घटनांवरील माहितीचं निरीक्षण करतं आणि संकलित करतं, त्यांच्या 'प्राथमिक विश्लेषणात' आढळले आहे की या औषधामुळे ड्रेस सिंड्रोम होते. 
advertisement
5/7
हे औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकलं जाणारं ओटीसी उत्पादन नाही. पण तरी मासिक पाळीच्या वेदना, डोकेदुखी आणि स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी हे औषध भारतीयांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. याशिवाय, उच्च तापाच्या प्रकरणांमध्ये हे औषध मुलांनाही दिलं जातं.
advertisement
6/7
ड्रेस सिंड्रोममध्ये शरीर विशिष्ट औषधांवर तीव्र प्रतिक्रिया देतात.  इओसिनोफिलिया आणि सिस्टीमिक लक्षणांसह अॅलर्जिक प्रतिक्रिया दिसते. त्वचेवर पुरळ येतात. अंतर्गत अवयवांवरही परिणाम होतो. ही प्रतिक्रिया अनुभवणारे सुमारे 10 टक्के लोकांचा मृत्यू होतो.
advertisement
7/7
त्यामुळे तुम्ही पेनकिलर घेतलात तर औषधांच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेवा. अशी काही लक्षणं दिसली तर IPC कडे तक्रार करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुम्हीसुद्धा हे पेनकिलर घेताय तर सावधान! मृत्यूचा धोका; केंद्र सरकारचा ALERT
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल