TRENDING:

ओठांचा काळसरपणा जाता जाईना? आता शेवटचा उपाय म्हणून 'हे' कराच

Last Updated:
महिला असो किंवा पुरुष, आपले ओठ गुलाबी असावे असं जवळपास सर्वांनाच वाटतं. काहीजणांचे ओठ काळसर असतात. काहीजणांना आपल्या ओठांचा रंग जसा आहे तसाच आवडतो. परंतु तुम्हाला आपले ओठ छान गुलाबी, मऊ असावे असं वाटत असेल तर आज आपण त्यासाठी काही रामबाण घरगुती उपाय पाहणार आहोत. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी / रायबरेली)
advertisement
1/5
ओठांचा काळसरपणा जाता जाईना? आता शेवटचा उपाय म्हणून 'हे' कराच
ओठ हा चेहऱ्यातला आणि सौंदर्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु हवामान बदलामुळे किंवा आपल्या वाईट सवयींमुळे ओठांचा मऊपणा दूर होतो, रंगही फिका पडतो. मग पुन्हा त्यांचा मूळ रंग कसा मिळवायचा, पाहूया.
advertisement
2/5
उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या आयुर्वेदिक डॉक्टर स्मिता सांगतात की, स्मोकिंग हे ओठ काळे पडण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. शिवाय जास्त काळ उन्हात काम केल्यामुळे, वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरल्यामुळेदेखील ओठ काळे पडतात.
advertisement
3/5
ओठांचा मूळ रंग परत मिळवण्यासाठी सर्वात आधी आहारात बदल करा. त्यासाठी भरपूर व्हिटॅमिन्स, प्रोटिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ खा. टोमॅटो, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि फळं खाण्यावर भर द्या.
advertisement
4/5
साखरेत थोडंसं ग्लिसरिन मिसळून ओठांना स्क्रब करा. 1-2 मिनिटं स्क्रब केल्यानंतर 5 मिनिटांनी ओठ स्वच्छ धुवून घ्या. आठवडाभर दिवसाआड हा प्रयोग केल्यास ओठ छान मऊ होतील.
advertisement
5/5
पोष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण असलेल्या बिटामुळेसुद्धा ओठ चमकदार होऊ शकतात. आर्धा चमचा बिटाचा रस, चमचाभर तूप आणि चमचाभर कोरफडाचा गर असा एक मास्क तयार करा. दररोज रात्री झोपताना हा मास्क ओठांना लावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
ओठांचा काळसरपणा जाता जाईना? आता शेवटचा उपाय म्हणून 'हे' कराच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल