टॉन्सिल्स सुजल्यामुळे घसा दुखतोय, बोलायलाही जमत नाही? करा उपाय, घरीच मिळवा आराम!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हिवाळा ऋतू प्रचंड सकारात्मकता घेऊन येतो. गुलाबी थंडीनं मन अगदी प्रसन्न होतं. मात्र त्यासोबत येतात साथीचे आजार, त्वचेचा रखरखीतपणा आणि घश्याची खवखव, खोकला. या दिवसांमध्ये टॉन्सिल्स सूजण्याचा त्रासही होतो.
advertisement
1/5

डॉ. प्रभात कुमार यांनी सांगितलं की, कायम ताजे अन्नपदार्थ खावे. थंडीत 2-3 दिवसांपूर्वीचे शिळे अन्नपदार्थ खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. शिळे ब्रेड तर अजिबात खाऊ नये.
advertisement
2/5
टॉन्सिल्सच्या समस्येवर आराम मिळवण्याचा सर्वात सोपा उपायही डॉक्टरांनी सांगितला आहे. ते म्हणाले, थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाणीच प्यावं. टॉन्सिल्सचा त्रास झाल्यास गरम पाण्यानं गुरळ्या कराव्या.
advertisement
3/5
जर टॉन्सिल्सचा त्रास वाढला तर 10 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम काळीमिरी, 40 ग्रॅम वेलची, 80 ग्रॅम तबशीर आणि 160 ग्रॅम खडीसाखर घ्यावी. सर्वकाही एकत्र करून छान एकजीव अशी पावडर बनवावी. ही पावडर सूती कापडात चाळावी. मग तयार झालेली पावडर तुळशीच्या पानात मिसळून चाटावी. यामुळे आराम मिळू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
4/5
लक्षात घ्या, घरगुती उपायांनी टॉन्सिल्सच्या त्रासावर आराम न मिळाल्यास ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्यावी. साधी घश्याची खवखव आहे, असं समजून त्रास अंगावर काढू नये, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
टॉन्सिल्स सुजल्यामुळे घसा दुखतोय, बोलायलाही जमत नाही? करा उपाय, घरीच मिळवा आराम!