मधुमेह आहे सावधान! तुमची एक चूक शरीरासाठी ठरेल घातक, हिवाळ्यात घ्या अशी काळजी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
हिवाळ्याच्या दिवसांत अनेक आजार डोकं वर काढत असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपलं आरोग्य जपावं लागतं.
advertisement
1/6

हिवाळ्याच्या दिवसांत अनेक आजार डोकं वर काढत असतात. अगदी जुने आजार देखील थंडीत त्रासदायक ठरतात. विशेषत: मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपलं आरोग्य जपावं लागतं. आहार, व्यायाम आणि इतर बाबींची योग्य ती काळजी घ्यावी लागते. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. मयुरा काळे यांनी माहिती दिलीये.
advertisement
2/6
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हिवाळ्यात आहाराची योग्य ती काळजी घ्यावी लागते. साखरेचे पदार्थ टाळलेच पाहिजेत. जेवणात जास्त तेलकट, तुपकट खाणं टाळावं. जास्त कॅलरिजचा आहार घेऊ नये. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. जास्त फायबरयुक्त आहार घ्यावा. थंडीत तहान लागत नाही, तरीही पाणी भरपूर प्यावे. काकडीसारखे पदार्थ आवर्जून खावेत. प्रोटिनयुक्त पदार्थ हिवाळ्यात मिळणारी फळे खाल्ली पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
3/6
हिवाळ्यात थंडीच्या कडाक्यामुळे बऱ्याचदा घराबाहेर जायला नको वाटतं. अशा स्थितीत मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी घरामध्ये बसूनच योगासने आणि प्राणायाम केले पाहिजे. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
advertisement
4/6
हिवळ्यात त्वचा करोडी पडण्याची समस्याना सर्वांनाच जाणवते. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांत याचे प्रमाण अधिक असते. थंडीमुळे पायांना भेगा पडून जखमा देखील होतात. त्यामुळे जखम वाढल्यास मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. शरीराला बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावावे. रात्री झोपताना पायांना तेल लावणंही फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
5/6
मधुमेहाच्या रुग्णांना थंडीत फ्लू म्हणजेच सर्दी, खोकला, ताप असे आजार देखील सतावू शकतात. यावर लवकर लक्ष न दिल्यास न्यूमोनियासारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे यावर योग्य ते उपचार वेळीच घेण्याची गरज असते. तसेच वेळेवर फ्ल्यू विरोधी लस घ्यावी, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
6/6
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
मधुमेह आहे सावधान! तुमची एक चूक शरीरासाठी ठरेल घातक, हिवाळ्यात घ्या अशी काळजी