Holi Mobile Safety : होळी पार्टीत एन्जॉय करताना मोबाइलचीही घ्या काळजी, 'या' ट्रिक्सने पाणी आणि रंगांपासून वाचवा फोन
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to keep mobile safe while playing holi : होळीमध्ये पाणी आणि रंगाची उधळण होते. हल्ली बऱ्याच ठिकाणी लोक एकत्र जमून तिथे होळी पार्टी करतात. म्हणजेच तिथे रंग, पाणी, मिठाया, गाणी आणि डान्स अशा सगळ्या वातावरणात होळी खेळली जाते. मात्र या जल्लोषात बऱ्याचदा आपला मोबाईल खराब होतो. अशावेळी मोबाई सांभाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देत आहोत.
advertisement
1/5

होळी खेळताना साहजिकच आपला मोबाईल आपल्या जवळ असेल तर त्यामध्ये पाणी आणि रंग जातात. यामुळे मोबाईल खराब होण्याची दाट शक्यता असते. प्रत्येकच मोबाईल वॉटरप्रूफ नसतो. असे मोबाईल तर हमखास खराब होता. म्हणूनच तुमचा मोबईल होळी पार्टीमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास टिप्स.
advertisement
2/5
होळी पार्टी एन्जॉय करताना तुम्ही मोबाईल एखाद्या वॉटरप्रूफ कव्हरमध्ये ठेवू शकता. यामुळे तो रंग आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहील. कव्हर नसल्यास तुम्ही मोबाईल एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू शकता.
advertisement
3/5
तुम्हाला महत्त्वाचे कॉल येणार असतील किंवा ते घ्यायचे असतील, तुम्ही ब्लूटूथ किंवा नेकबँडचा वापर करू शकता. यामुळे तुमचा फोन तुम्हाला बाहेर काढावा लागणार नाही आणि तुम्हाला त्याचा वापरही करता येईल. मोबाईल बॅगेत ठेऊन तुम्ही पार्टीचा आणि रंगांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
advertisement
4/5
मोबाईल रंग आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी तो क्लिन्ज रॅप किंवा एखाद्या प्लास्टिक शिटरमध्ये गुंडाळा आणि वरून चिकटपट्टी लावा. यामुळे मोबाईलमध्ये पाणी किंवा रंग जाणार नाही.
advertisement
5/5
तुम्ही होळी पार्टीला जिथे जाणार आहात तिथे जर मोबाईल घेऊन जाण्याची गरज असेल तर तो घरीच ठेवा. जर तुम्ही मोबाईल घेऊन गेलेच तर तो तुमच्या खिशात न ठेवता. एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Holi Mobile Safety : होळी पार्टीत एन्जॉय करताना मोबाइलचीही घ्या काळजी, 'या' ट्रिक्सने पाणी आणि रंगांपासून वाचवा फोन