TRENDING:

Weekly Horoscope: होळी पौर्णिमेवर सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ

Last Updated:
Weekly Horoscope Marathi: ग्रहांच्या स्थितीमुळे हा आठवडा सर्व राशींसाठी संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. मेष, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामातली थोडीशी हलगर्जी, विरोधकांचा त्रास, विनाकारण वाढणारे खर्च आणि घरगुती मतभेद यामुळे मानसिक ताण येण्याची शक्यता आहे. अशा वेळी डोकं शांत ठेवून आणि संयमाने पावलं टाकणं फायद्याचं ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः थकवा आणि पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक वागलं तर नुकसान टाळता येईल. दुसरीकडे वृषभ, मिथुन, सिंह, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे दरवाजे उघडतील. करिअरमध्ये यश, आर्थिक लाभ आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याचे योग आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील आणि नोकरीत मान-सन्मान वाढेल. घरगुती वातावरण आनंदी राहील आणि प्रियजनांची साथ मिळेल.
advertisement
1/12
होळी पौर्णिमेवर सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात सावधगिरी बाळगा हाच मंत्र आहे. कोणतीही गोष्ट घाईने करू नका आणि रस्ता ओलांडताना किंवा गाडी चालवताना पूर्ण लक्ष द्या. नोकरीत पहिल्या दोन-तीन दिवसात कामात अजिबात हलगर्जीपणा करू नका, नाहीतर वरिष्ठांचा रोष ओढवून घ्यावा लागेल. ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात असलेल्या लोकांपासून सावध राहा. सुरुवातीला तब्येत आणि नात्यांच्या बाबतीत वेळ थोडी कठीण वाटेल, त्यामुळे लोकांशी बोलताना नम्र राहा. पण आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी शोधणाऱ्यांना आशेचा किरण दिसेल. प्रयत्नांना यश मिळेल, त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी करा. प्रेमसंबंधांसाठी वेळ चांगली असून जोडीदाराशी ताळमेळ सुधारेल.लकी कलर: हिरवा, लकी नंबर: 1
advertisement
2/12
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपली ऊर्जा, पैसा आणि वेळ यांचं नियोजन नीट केलं, तर चांगले परिणाम दिसून येतील. आठवड्याची सुरुवात थोड्या मोठ्या खर्चाने होऊ शकते. घरगुती समस्या सोडवण्यात बराच वेळ खर्च होईल. मुलांच्या अडचणी किंवा घरातील मोठ्यांच्या तब्येतीची चिंता तुम्हाला सतावू शकते, पण कठीण प्रसंगी तुमची माणसं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि जवळचे मित्र तुम्हाला पूर्ण साथ देतील. आर्थिक प्रगतीचे योग आहेत; जुन्या गुंतवणुकीतून आठवड्याच्या शेवटी मोठा फायदा होऊ शकतो. व्यापारासाठी हा काळ नफ्याचा आहे आणि एखादी मोठी डील फायनल होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील.लकी कलर: पिवळा, लकी नंबर: 10
advertisement
3/12
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच शुभ आणि यश देणारा ठरेल. तुमच्या अपेक्षांच्या आधी तुमची कामं पूर्ण झाल्याचं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कामाच्या निमित्ताने एखादा लांबचा प्रवास करावा लागू शकतो, जो सुखाचा आणि फायद्याचा असेल. प्रवासात काही प्रभावशाली लोकांशी ओळखी होतील. कमी साधनांमध्येही तुम्ही मोठं यश मिळवून दाखवाल. भागीदारीत काम करणाऱ्यांना या महिन्यात चांगले पैसे मिळतील. आठवड्याच्या उत्तरार्धात करिअर किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्ही एखादा धाडसी निर्णय घ्याल. भावंडांशी असलेले संबंध प्रेमाचे राहतील. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील. घरात एखादं शुभ कार्य ठरेल किंवा लग्नाचं जमू शकेल.लकी कलर: निळा, लकी नंबर: 2
advertisement
4/12
कर्क - कर्क राशीसाठी आठवड्याची सुरुवात जेमतेम असेल, पण दुसरा भाग खूप चांगला जाईल. त्यामुळे महत्त्वाची कामं 15 मार्चनंतर किंवा आठवड्याच्या शेवटीच प्लॅन करा. सुरुवातीला करिअर, कुटुंब किंवा व्यवसायाशी संबंधित कटकटी जाणवतील. जमिनीच्या किंवा घराच्या व्यवहारासाठी धावपळ करावी लागेल. नोकरीत कामं पूर्ण करण्यासाठी जास्त घाम गाळावा लागेल. तुमच्या हट्टीपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतरांशी जुळवून घ्या. मुलांच्या बाबतीत एखादी चिंता सतावेल. पण उत्तरार्धात आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. नात्यात गैरसमज होऊ देऊ नका, एकमेकांच्या भावनांचा आदर करा.लकी कलर: पिवळा, लकी नंबर: 9
advertisement
5/12
सिंह - सिंह राशीसाठी हा आठवडा नशिबाची साथ देणारा असेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही कठीण कामं सुद्धा चुटकीसरशी पूर्ण कराल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना हवी तशी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमचा प्रभाव वाढेल. वरिष्ठांच्या मदतीने जुन्या समस्या सुटतील आणि तुमचं कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि बँकेतली पुंजी वाढेल. उत्तरार्धात कामाच्या पद्धतीत थोडे बदल करावे लागतील. व्यापाऱ्यांनी पैशांचे व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी. भावंडांशी प्रेम टिकून राहील. घरात एखाद्या यशामुळे सेलिब्रेशनची तयारी होईल. प्रेमात असलेल्यांची जवळीक वाढेल.लकी कलर: नारंगी, लकी नंबर: 3
advertisement
6/12
कन्या - कन्या राशीसाठी हा आठवडा थोडा संमिश्र असेल. सुरुवातीला तब्येत थोडी नरम-गरम राहू शकते. ठरवलेल्या कामात उशीर झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल आणि चिडचिड वाढेल. आरोग्य आणि नात्यांच्या बाबतीत थोडा ताण येऊ शकतो. मुलांशी काही कारणावरून खटका उडू शकतो. पैशांच्या बाबतीत हात आखडता घ्या, नाहीतर आर्थिक ओढाताण होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि ऑफिसमध्ये ताळमेळ राखताना दमछाक होईल. उत्तरार्धात तुमची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तुम्हाला जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. व्यापारात मंदी जाणवू शकते. प्रेमाच्या बाबतीत अति-उत्साह दाखवणं महागात पडू शकतं, त्यामुळे सावध राहा. वैवाहिक आयुष्यात थोडी वादावादी झाली तरी नातं टिकून राहील.लकी कलर: तपकिरी, लकी नंबर: 1
advertisement
7/12
तूळ - तूळ राशीच्या लोकांना कष्टाच्या मानाने थोडं कमी फळ मिळाल्यासारखं वाटेल, ज्यामुळे मन थोडं उदास होईल. कामातले अडथळे आणि घरच्यांचा पाठिंबा न मिळणं यामुळे चिंता वाढेल. यशासाठी कोणताही चुकीचा रस्ता निवडू नका, नाहीतर मोठी अडचण येऊ शकते. व्यवसायात असाल तर जिथे पैसा अडकून पडेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीत स्वतःची कामं दुसऱ्यावर सोडू नका. नवीन नोकरी असेल तर बॉसचा मूड ओळखून काम करा, नाहीतर सर्वांसमोर ओरडा खावा लागेल. वडिलांच्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.लकी कलर: पांढरा, लकी नंबर: 1
advertisement
8/12
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात धीर सोडू नका. सावकाश का होईना, पण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल. आपली कामं स्वतः पूर्ण करण्यावर भर द्या, इतरांच्या मदतीची वाट बघत बसू नका. व्यापाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात आव्हानात्मक असू शकते; मंदीसोबतच स्पर्धकांचा त्रास जाणवेल. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतील. प्रवासात थकवा येईल आणि अपेक्षित कामं होणार नाहीत. उत्तरार्धात परिस्थिती थोडी सुधारेल, पण मेहनत वाढवावी लागेल. जमीन किंवा घरगुती वादात तडजोड केली तर बरं होईल, नाहीतर प्रकरण लांबत जाईल. नात्यात जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा एकमेकांना माफ करायला शिका.लकी कलर: निळा, लकी नंबर: 3
advertisement
9/12
धनु - धनु राशीसाठी हा आठवडा चढ-उतारांचा असेल. कामातली आव्हानं ओळखायला तुम्ही कमी पडू शकता, ज्यामुळे काही अडचणी उभ्या राहतील. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक आलेले खर्च आणि जुनी देणी यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. नोकरी करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी मशीनसारखं काम करावं लागेल, ज्यामुळे खूप थकवा येईल. कुणाच्याही वादात पडू नका, शांत राहणं चांगलं ठरेल. व्यवसायात रिस्क घेण्याची ही वेळ नाही, मार्केटचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या. पण उत्तरार्धात हुशारीने एखादा व्यवहार केलात तर चांगला नफा मिळू शकतो. वैयक्तिक नात्यात समोरच्याचं ऐकून घ्या. जोडीदाराची साथ तुम्हाला बळ देईल.लकी कलर: निळा, लकी नंबर: 9
advertisement
10/12
मकर - मकर राशीसाठी हा आठवडा थोडा अस्थिर असेल. नोकरीत अचानक कामाचा बोजा वाढेल, जो पूर्ण करण्यासाठी खूप कसरत करावी लागेल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्यामुळे मन उदास होईल. उच्च शिक्षणाची स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडी अजून वाट पाहावी लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला मालमत्तेवरून घरात कटकटी होऊ शकतात. मुलं किंवा जोडीदाराच्या वागण्यामुळे तुमची चिंता वाढेल. संकटांपासून पळ काढण्यापेक्षा त्यांना सामोरं जा, कारण जबाबदाऱ्या टाळून चालणार नाही. नातेवाईकांशी बोलताना जपून बोला. प्रेमाची कबुली द्यायची असेल तर घाई करू नका, योग्य वेळेची वाट पाहा.लकी कलर: गुलाबी, लकी नंबर: 4
advertisement
11/12
कुंभ - कुंभ राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. कामाच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. सुरुवातीला थोडा खर्च वाढेल, पण पैशांची आवकही चांगली राहील. जमीन खरेदी किंवा विक्रीची तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते, फक्त कागदपत्रं नीट तपासा. कामाच्या ठिकाणी खोटं बोलणं किंवा नियम मोडणं टाळा, नाहीतर बदनामी होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. वैयक्तिक नात्यात घरच्यांच्या काही तक्रारी असू शकतात. प्रेमात उतावीळपणा करू नका. वैवाहिक सुख जपण्यासाठी जोडीदाराला थोडा निवांत वेळ द्या.लकी कलर: लाल, लकी नंबर: 7
advertisement
12/12
मीन - मीन राशीसाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे. तुम्हाला घरून आणि बाहेरूनही मोठा पाठिंबा मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांची तुमच्यावर मेहेरनजर असेल आणि एखादी मोठी जबाबदारी किंवा पद तुम्हाला मिळू शकतं. लेखन, पत्रकारिता किंवा रिसर्च क्षेत्रात असणाऱ्यांचा समाजात मान वाढेल. व्यवसायाचा विस्तार होईल आणि नफा वाढल्यामुळे रोजचं उत्पन्न सुधारेल. परदेशात जाण्याची किंवा तिथे शिकण्याची तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. घरात एखादं धार्मिक किंवा मंगल कार्य घडेल. लग्नाचे योग जुळून येतील आणि प्रेमसंबंधांत गोडवा राहील. वैवाहिक जीवन खूप छान असेल.लकी कलर: पांढरा, लकी नंबर: 8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: होळी पौर्णिमेवर सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल