TRENDING:

मासिकपाळीत असह्य त्रास होतो? पोटदुखीवर आराम देणारे 7 घरगुती रामबाण उपाय!

Last Updated:
नियमित मासिकपाळी हे सुदृढ गर्भाशयाचं लक्षण आहे. मासिकपाळीदरम्यान काहीसा त्रास होणं सामान्य आहे. परंतु काहीजणींना त्या दिवसांमध्ये असह्य वेदना सोसाव्या लागतात. अशावेळी काय करावं आणि काय नको काही सूचत नाही. आज आपण मासिकपाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांवर काही घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत. (हिना आझमी, प्रतिनिधी)
advertisement
1/7
मासिकपाळीत असह्य त्रास होतो? पोटदुखीवर आराम देणारे 7 घरगुती रामबाण उपाय!
आलं, बडीशेप आणि पुदिन्याचा चहा आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. या चहामुळे मासिकपाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांवर आराम मिळू शकतो, असं म्हणतात.
advertisement
2/7
तव्यावर मीठ घालून त्यात हलका भाजलेला ओवा घातलेलं कोमट पाणी प्यायल्यास पोटदुखीवर आराम मिळू शकतो, शिवाय गॅसचा त्रासही कमी होऊ शकतो. मासिकपाळीदरम्यानच्या त्रासावर हा उपाय फायदेशीर ठरतो.
advertisement
3/7
दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे मासिकपाळीतील वेदना कमी होतात. तसंच आलं, दालचिनी, बडीशेप आणि पुदिन्याच्या पानांचा काढा प्यायल्यानंही आराम मिळतो आणि शरीराला उब मिळते.
advertisement
4/7
हळदीत नैसर्गिक पोषक तत्त्व असतात. आठवड्यातून एकदा हळद, आलं, दालचिनी पाण्यात उकळून प्यायल्यास मासिकपाळीतील वेदना कमी होऊ शकतात.
advertisement
5/7
गाजर, काकडीसह फायबरयुक्त भाज्या आणि फळं खाल्ल्यानं अन्नपचन व्यवस्थित होतं. तसंच शरीरातील हॉर्मोन्सची पातळी संतुलित राहते. एकूणच परिपूर्ण आहार घेऊन मासिकपाळीतील वेदना कमी करणं शक्य होऊ शकतं.
advertisement
6/7
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसं पाणी पिणं अत्यावश्यक असतं. कोमट पाणी पिणं उत्तम मानलं जातं.
advertisement
7/7
पोट दुखत असेल तर एरंडेल तेल कोमट तापवून त्यानं पोटाला हलकी मालिश करावी. यामुळे जरा आराम मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
मासिकपाळीत असह्य त्रास होतो? पोटदुखीवर आराम देणारे 7 घरगुती रामबाण उपाय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल