TRENDING:

चायनीज पदार्थातील अजिनोमोटोचे सेवन करताय? वेळीच व्हा सावध, शरीरावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Last Updated:
चायनीज पदार्थ करताना त्यामध्ये एक पदार्थ आवर्जून वापरला जातो तो पदार्थ म्हणजे अजिनोमोटो. हा अजिनोमोटो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे.
advertisement
1/5
अजिनोमोटोचे सेवन करताय? वेळीच व्हा सावध, शरीरावर होतील 'हे' गंभीर परिणाम
अनेक व्यक्तींना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात. काही व्यक्तींना दररोज जरी चायनीज पदार्थ खायला दिले तरी ते आवडीने खातात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चायनीज खायला खूप आवडतं.
advertisement
2/5
चायनीज पदार्थ करताना त्यामध्ये एक पदार्थ आवर्जून वापरला जातो तो पदार्थ म्हणजे अजिनोमोटो. हा अजिनोमोटो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. तर याचे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितलेली आहे.
advertisement
3/5
1 ग्रॅम अजिनोमोटोमध्ये 380 ग्रॅम एवढं सोडियम आहे. ही सोडियमची मात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती अत्यंत हानिकारक आहे. अजिनोमोटो ग्रॅममध्ये वापरतात कारण की चव येते. अजिनोमोटो हे आपल्या सर्वांच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. कोणतेही पदार्थ विकत घेताना त्यामध्ये अजिनोमोटोची किती मात्रा आहे हे तपासूनच घ्यावे आणि ज्या पदार्थांमध्ये अजिनोमोटो आहे ते पदार्थ खाणे टाळावे, असं आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
4/5
अजिनोमोटो खाल्ल्यानंतर आपल्या उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला पदार्थांमध्ये अजिनोमोटोची चव आणायची असेल तर तुम्ही आपल्या स्वयंपाक घरामध्ये लिंबू, आद्रक, काळे मीठ, हळद हे सर्व घटक समप्रमाणात घेतले तर याची चव ही सेम अजिनोमोटोसारखी लागते.
advertisement
5/5
अजिनोमोटो हे आपल्या शरीरासाठी, हृदयासाठी आणि लिव्हरसाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे शक्यतो अजिनोमोटो असलेले पदार्थ खाणे टाळावे. जर तुम्हाला अजिनोमोटो असलेले पदार्थ खायचे असतील तर तुम्ही महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एखाद्या वेळेस पदार्थ खाऊ शकता पण त्यामध्ये त्याची मात्रा किती आहे हे तपासूनच पदार्थ खावे. त्यामुळे चायनीज पदार्थ खाताना तुम्ही सावधगिरी बाळगूनच खावे नाहीतर ह्या अजिनोमोटोचा आपल्या शरीरावरती अत्यंत वाईट परिणाम होतो, असं देखील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
चायनीज पदार्थातील अजिनोमोटोचे सेवन करताय? वेळीच व्हा सावध, शरीरावर होतील 'हे' गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल