TRENDING:

सर्दी, खोकलाच नाहीतर हृदयरोगही होईल गायब, हा प्राणायाम करून तर पाहा

Last Updated:
या प्राणायाममुळे सर्दी, खोकला, एलर्जी, दमा, सायनस, लकवा अशासारखे असाध्य रोग दूर होतात.
advertisement
1/5
सर्दी, खोकलाच नाहीतर हृदयरोगही होईल गायब, हा प्राणायाम करून तर पाहा
आपल्या सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी प्राणायामाचे खूप महत्त्व आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा प्राणायाम म्हणजे अनुलोम-विलोम होय. गंभीर आजारांवरही अनुलोम-विलोम हा प्राणायाम उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे हा प्राणायाम करण्याची योग्य पद्धत कोणती? तसेच या प्राणायामाचे मानवी शरीरासाठी किती फायदे आहेत? कोणकोणत्या आजारांवर हा प्राणायाम हितकारक ठरू शकतो? यासंदर्भात <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील ज्येष्ठ योग मार्गदर्शक दामोदर राऊत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/5
अष्टांग योगातील चौथं आणि महत्त्वपूर्ण अंग म्हणजे प्राणायाम होय. प्राणायाममध्ये पाचव्या क्रमांकाचे प्राणायाम अनुलोम विलोम आहे. हे करत असताना उजवा अंगठा उजव्या नासिकेवर ठेवून नासिका बंद करायची आणि डाव्या नासिकेने लांब श्वास घेऊन उजव्या नासिकेने सोडायचा आहे. परत उजव्या नासिकेने श्वास घेऊन डाव्या नासिकेने सोडायचा आहे. डावी नासिका ही चंद्र स्वर आहे म्हणजे शीतलतेचं प्रतीक आहे. तर उजवी नासिका ही सूर्य स्वर आहे. म्हणजे उष्णतेचे प्रतीक आहे, असं राऊत सांगतात.
advertisement
3/5
नवीन साधकांनी जवळजवळ पाच ते पंधरा मिनिटं अनुलोम विलोम करावं. तसेच हळूहळू वाढवून अर्धा तासापर्यंत करू शकता. या प्राणायामचे अनण्यसाधारण महत्त्व आहे. हा प्राणायाम आपण कधीही शांत बसून असताना करू शकतो. विशेष म्हणजे हे प्राणायाम करत असताना एक काळजी घ्यायची आहे की डाव्या नासिकेतूनच लांब श्वास भरायचा आहे. शितलतेकडून उष्णतेकडे जायचं असतं, अशी माहिती दामोदर राऊत यांनी दिली.
advertisement
4/5
हिवाळ्यामध्ये या प्राणायामाचे फार मोठे फायदे आहेत. या प्राणायाममुळे सर्दी, खोकला, एलर्जी, दमा, सायनस, लकवा अशासारखे असाध्य रोग दूर होतात. सोबतच मायग्रेन, मानसिक आजार यांपासून सुटका मिळवता येऊ शकते. कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगासंबंधी जेवढे काही आजार आहेत हृदयाचे ब्लॉकेज देखील या प्राणायाममुळे नष्ट होतात. एवढं महत्त्वपूर्ण हे प्राणायाम आहे.
advertisement
5/5
अनुलोम विलोम प्राणायाममुळे आपल्या संपूर्ण नसनाड्या या परिशुध्द होत असतात. म्हणजे ऑक्सिजन आहे तो नासिकेच्या प्रवेशद्वारातून आपल्या शरीरात प्रवेश करत असतो. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतो. आपल्याला जे काही असाध्य रोग आहेत ते नष्ट होतात आणि येणारे रोग हे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. इतकी ताकद या प्राणायामाची आहे. मधुमेह, आमवात, गाठी, सोरायसस या सर्व व्याधी दूर होतात, असंही योग मार्गदर्शक राऊत सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
सर्दी, खोकलाच नाहीतर हृदयरोगही होईल गायब, हा प्राणायाम करून तर पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल