TRENDING:

Home Remedy : हाताचे कोपर काळवंडलेत? 'हे' घरगुती उपाय करा, काही दिवसांत त्वचा होईल उजळ आणि मऊ

Last Updated:
कोपरावरचे टॅनिंग घालवण्यासाठी बऱ्याचदा लोक बाजारातून महागडे स्क्रब्स, डी-टॅनिंग पॅक्स आणि क्रीम्स विकत घेतात. पण तुम्हाला स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय हवा असेल तर, आजचा लेख तुमच्यासाठीच आहे.
advertisement
1/9
हाताचे कोपर काळवंडलेत? 'हे' घरगुती उपाय करा, काही दिवसांत त्वचा होईल उजळ आणि मऊ
उन्हाळ्यात बऱ्याचदा टॅनिंगचा खूप त्रास होतो. शरीरावर झालेलं टॅनिंग तसं काढता येतं. पण काही भागांवरचं टॅनिंग सहज निघत नाही. तसाच एक भाग म्हणजे हाताचे एल्बो म्हणजेच हाताचे कोपर. कोपरांची त्वचा लवकर काळवंडते. आणि इथले टॅनिंग स्पष्टपणे दिसते. त्यामुळे ते काढणं खूप गरजेचं असतं.
advertisement
2/9
काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कोपरावरचे टॅनिंग काही दिवसात सहज दूर करू शकता. या उपायांनी कोपराची त्वचा उजळ आणि स्वच्छ होईल. त्याचबरोबर यामुळे त्वचा तिला मऊ आणि ग्लोइंगसुद्धा दिसेल.
advertisement
3/9
पहिला उपाय पेट्रोलियम जेली आणि हळदीचा आहे. एका वाटीत एक चमचा पेट्रोलियम जेली घ्या. त्याच वाटीत 1/4 चमचा हळद पावडर घाला. साध्या हळदीऐवजी कस्तुरी हळद वापरल्यास चांगले परिणाम दिसतील. हे ​​दोन्ही व्यवस्थित एकत्र करा.
advertisement
4/9
ही पेस्ट तुमच्या हाताच्या कोपरांवर व्यवस्थित लावा. तुम्ही ती पायाच्या घोट्यांवरही वापरू शकता. हे लावून किमान अर्धा तास तसेच राहू द्या. तुम्ही हे रात्रभर देखील लावू शकता. 30 मिनिटांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी कोपर धुवा आणि यासाठी साठी कोमट पाण्याचा वापर करा.
advertisement
5/9
धुतल्यानंतर हातांवर चांगलं मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. हे वापरल्यानंतर काही आठवड्यांत तुम्हाला टॅनिंग जात असल्याचं दिसेल. पेट्रोलियम जेलीने त्वचेला आर्द्रता मिळेल आणि हळद त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करेल. यामुळं त्वचा उजळ आणि मऊ होईल.
advertisement
6/9
कोपरांचा काळवंडलेपणा घालवण्यासाठी आणखी एक उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला 1 चमचा कॉफी, 2 चमचे दही, 2 थेंब लिंबाचा रस, 2 चमचे गुलाबपाणी लागेल.
advertisement
7/9
एका वाटीमध्ये कॉफी पावडर घ्या. त्यात दही घाला आणि चांगले मिसळून घ्या. आता त्यात लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घाला. हे मिश्रण मऊसूत आणि एकजीव होईपर्यंत मिसळा.
advertisement
8/9
तयार मिश्रण तुमच्या कोपरांच्या काळवंडलेल्या भागावर भरपूर प्रमाणात लावा आणि ते सुकू द्या. सुकल्यानंतर स्वच्छ धुवून ओल्या कापडाने पुसा.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Home Remedy : हाताचे कोपर काळवंडलेत? 'हे' घरगुती उपाय करा, काही दिवसांत त्वचा होईल उजळ आणि मऊ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल