Kitchen Hacks : तूप कढवल्यानंतर बेरी उरलीय? अजिबात फेकू नका, 'ही' ट्रिक वापरून करू शकता स्मार्ट वापर!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to get more ghee from leftover residue : आपल्याकडे स्वयंपाकात तूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. बऱ्याच घरांमध्ये ते बनवलंही जातं. मात्र तूप बनवताना बेरीही बनते आणि बरेच लोक ती वेस्ट म्हणून फेकून देतात. मात्र तुम्ही त्याच बेरीपासून आणखी जास्त तूप बनवू शकता. चला पाहुया कसे.
advertisement
1/5

तूप बनवण्याची पद्धत थोडी वेळखाऊ असली तरी घरी बनवलेल्या तूपसारखी चव बाजारातल्या तुपाला अजिबात येत नाही. लोणी कढवून तूप बनवलं जातं. लोणी काढावल्यानंतर तुपासोबत बेरीदेखील बनते. ती भांड्याच्या तळाशी बसते आणि तूप वर येतं. ही बेरी फेकून न देता. तुम्ही पासून आणखी जास्त तूप काढू शकता.
advertisement
2/5
तूप बनवताना भांड्याच्या तळाशी एक तपकिरी किंवा दाणेदार पदार्थ राहतो, ज्यामुळे थोडे तूप त्यात अडकून राहते. यातून तूप काढण्यासाठी आधी उरलेली बेरी एका खोल भांड्यात टाका आणि त्यात सुमारे तीन ते चार कप पाणी घाला.
advertisement
3/5
आता हे मिश्रण गॅसवर ठेवा आणि त्याला उकळी येऊ द्या. उकळताना बेरी तळाशी लागून जळू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा. पाणी आणि कचरा पूर्णपणे मिसळल्यानंतर आणि उकळी आल्यावर, गॅस बंद करा. हे मिश्रण खोलीच्या तापमानात थोडं थंड होऊ द्या.
advertisement
4/5
मिश्रण थंड झाल्यावर ते एका भांड्यात किंवा कंटेनरमध्ये गाळून काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये यातील पाणी आणि तूप वेगळे होऊ लागते. काही वेळाने जेव्हा तुम्ही कंटेनर बाहेर काढाल तेव्हा तुम्हाला दिसेल की वरच्या बाजूला तुपाचा मोठा थर तयार झाला आहे.
advertisement
5/5
वर आलेले हे शुद्ध तूप असते. जे बेरीसोबत फेकले जाऊ शकले असते. मात्र या पद्धतीचा वापर करून तुम्ही ते तूप बाजूला करू शकता. आता तुम्ही ही उरलेली बेरी फेकून देऊ शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : तूप कढवल्यानंतर बेरी उरलीय? अजिबात फेकू नका, 'ही' ट्रिक वापरून करू शकता स्मार्ट वापर!