त्याच्यापासून सावध राहा, अश्विनचा इशारा
टीम इंडियाचा अनुभवी बॉलर आर.अश्विन यानेही फायनलमध्ये या बॉलरपासून सावध राहण्याचा इशारा टीम इंडियाला दिला आहे. कोल मॅकॉन्की हा न्यूझीलंडचा सुपर हिरो आहे, असं अश्विन म्हणाला आहे. मॅकॉन्कीसारख्या आक्रमक ऑफ स्पिनरमुळे अभिषेक शर्मा आणि इशान किशनसारख्या डावखुऱ्या खेळाडूंना धोका निर्माण होऊ शकतो, असं अश्विन म्हणाला आहे. अश्विनच्या मते, इशानला ऑफ-साईडवर मोठे शॉट्स खेळण्यास अडचण येते आणि मॅकॉन्की या कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्याला तिथेच फटके मारण्यास भाग पाडू शकतो. अभिषेकला लेग-साईडवर फटके मारण्यात अडचण येते, म्हणून अश्विनने त्याला "हेडलेस बॅटिंग" ऐवजी खेळाची जाणीव दाखवण्याचा सल्ला दिला.
advertisement
शनिवारची शांत तयारी
शनिवारी संध्याकाळी अहमदाबादमधील मोटेरा येथे सर्वांच्या नजरा मोठ्या स्टार्सवर असताना, कोल मॅकॉन्की शांतपणे त्याच्या बॉलिंगवर काम करताना दिसला. त्याने नेटमध्ये बराच वेळ घालवला आणि त्याने स्वत:च्या लेन्थवर काम केलं.
अश्विनने मॅकॉन्कीच्या स्पिनचा मुकाबला करण्यासाठी "स्मार्ट प्ले" सुचवला आहे. अश्विनचा विश्वास आहे की सतत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्ट्राईक फिरवल्याने स्पिनरवर दबाव येऊ शकतो. ऑफ स्पिनर दबाव आणत असेल तर अभिषेकने एक रन काढावी आणि संजू सॅमसनसारख्या फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूला स्टाईक द्यावा, जो स्पिनरविरुद्ध चांगला खेळतो, असं अश्विन म्हणाला आहे.
सेमी-फायनल हिरो
मॅकॉन्कीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये क्विंटन डिकॉक आणि रेयान रिकलटन या दोन डावखुऱ्या बॅटरची विकेट घेतली होती, ज्यामुळे न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला गेला. मॅकॉन्कीचा फॉर्म आणि अहमदाबादची स्पिन बॉलिंगला अनुकूल खेळपट्टी टीम इंडियासाठी सगळ्यात मोठं आव्हान असेल.
