Spa At Home : रिलॅक्सींग Spa चा अनुभव घ्यायचाय, तोही घरी आणि कमी खर्चात? फक्त 'या' 10 टिप्स करा फॉलो
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to get spa experience at home : बऱ्याच लोकांना स्पामध्ये जाऊन रिलॅक्स होण्याची इच्छा असते. तिथे केल्या जाणाऱ्या सर्व ट्रीटमेंट्स आपल्या शरीराला पूर्णपणे रिलॅक्स करतात. पण हे खूप खर्चिक असू शकते. अशावेळी जर आपल्याला घराच्या घरी हा अणुइभव घेण्याची संधी मिळाली तर? आज आम्ही तुम्हाला घरीच स्पाचे वातावरण कसे सेट करायचे याची माहिती देत आहोत.
advertisement
1/9

स्पाचा अनुभव वेगळा असतो कारण तिथे वातावरण वेगळे असते. म्हणून स्पाचे वातावरण तयार करण्यासाठी तुमची खोली आकर्षक आणि सुंदर सजवा. मेणबत्त्या, अत्तर फुलांच्या पाकळ्या या सर्वांनी तुम्ही सजावट करू शकता. मंद संगीत लावा. याने तुमचा मूड सेट होण्यास मदत होते.
advertisement
2/9
स्पामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात. तशाच तुम्हाला जे काही हवे आहे त्याची यादी बनवा आणि संबंधित सर्व प्रोडक्टस तयार ठेवा. स्पाच्या अनुभवासाठी DIY फेस मास्क आणि फेस स्क्रब तयार करा.
advertisement
3/9
स्पाच्या सर्व ट्रीटमेंट्स सुरु करण्यापूर्वी छान गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळेल आणि शरीरातील तणाव वेदना कमी होतील.
advertisement
4/9
सुरुवातीला शरीरासाठी चांगले सुगंधी बॉडी स्क्रब वापरा. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकेल. तुम्ही एखादे DIY बॉडी स्क्रबदेखील बनवू शकता. यानेही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
advertisement
5/9
स्पाचा अनुभव स्टीमशिवाय कसा पूर्ण होईल. म्हणून चेहऱ्यावर गरम पाण्याने हळूवारपणे वाफ घ्या. यावेळी स्वच्छ टॉवेलने केस झाकून घ्या. वाफेने तुमच्या त्वचेचे छिद्र उघडतात. हे 10-15 मिनिटे कर.
advertisement
6/9
वाफेनंतर चेहऱ्यावर कोणताही तुमच्या आवडीचा स्क्रब वापरा. स्क्रब त्वचेला एक्सफोलिएट करते. स्क्रबने तुमचा चेहरा हळूवारपणे मसाज करा. नंतर स्वच्छ धुवा आणि तुमची त्वचा मऊ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.
advertisement
7/9
यानंतर चेहऱ्यावर आणि हवे आल्यास शरीरालाही तुम्ही इसेन्शियल ऑइलने मसाज करू शकता. यासाठी तुम्ही जास्मिन इसेन्शियल ऑइल, गुलाब इसेन्शियल ऑइल आणि जीरेनियम इसेन्शियल ऑइल वापरू शकता. मसाज केल्यानंतर थोडा आराम करा.
advertisement
8/9
आता वेळ आहे हात आणि पायांची स्वच्छता करण्याची. कोमट पाण्यात हात पाय भिजवा. DIY स्क्रब वापरून एक्सफोलिएट करा, नखे ट्रिम करा, या सर्वानानंतर हात आणि पायांना चांगले मॉइश्चरायझर लावा.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Spa At Home : रिलॅक्सींग Spa चा अनुभव घ्यायचाय, तोही घरी आणि कमी खर्चात? फक्त 'या' 10 टिप्स करा फॉलो