Adultrated Butter : स्वस्तच्या नादात तुम्ही भेसळयुक्त बटर तर वापरत नाही ना? 'या' पद्धतीने तपासा शुद्धता..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to identify adulterated butter : हल्ली कोणत्याही पदार्थमध्ये भेसळ केली जाऊ शकते. बाजारातून आणली जाणारी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ आता फारसे सुरक्षित नसतात. नुकतीच बटर आणि चीजमध्येही भेसळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त बटर कसं ओळखायचं याबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
1/7

हल्ली मिठाई, दूध, दही, मसाले आणि इतर अनेक वस्तूंमध्ये भेसळ केल्याचे आढळत आहे. जम्मू आणि काश्मीर येथील राजौरी येथे अलिकडेच बटर आणि चीजमध्ये भेसळ केल्याची घटना समोर आली आहे. इथे कृत्रिम रसायनांनी भरलेले बटर आणि चीज बाजारात उघडपणे विकले जात होते.
advertisement
2/7
औषध आणि अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत असे आढळून आले की बटर आणि चीज दोन्हीमध्ये भेसळ केली जात होती. दोन्ही उत्पादनांमध्ये अशी रसायने होती, जी आपल्या आरोग्याला गंभीरपणे हानी पोहोचवू शकतात. तुम्हीही स्वस्त म्हणून असे मोकळे बटर किंवा चीज खरेदी करत असाल ते शुद्ध आहे की नाही हे ओळखणे गरजेचे आहे.
advertisement
3/7
बटर आणि चीज शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी तळहातावर बटरचा एक छोटा तुकडा ठेवा. जर तुमच्या तळहाताच्या उष्णतेने ते वितळले तर ते बटर शुद्ध असण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
तुम्ही पाण्यात टाकूनदेखील बटर शुद्ध आहे की नाही ते तपासू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात बटरचा एक छोटा तुकडा टाका. आयोडीनचे काही थेंब टाका आणि मिसळा. बटर जांभळे झाले तर त्यात स्टार्चची भेसळ केली गेलेली असू शकते.
advertisement
5/7
बटर शुद्ध आहे की नाही हे तपासण्याची आणखी एक पद्धत म्हणजे कोमट पाणी. एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात बटरचा तुकडा घाला. जर बटर शुद्ध असेल तर ते लगेच वितळेल, मात्र जर ते भेसळयुक्त असेल तर त्याचे अनेक तुकडे आहोत.
advertisement
6/7
शुद्ध बटरला ताजी आणि सौम्य चव आणि वास असतो. मात्र भेसळयुक्त बटरला तीव्र, तेलकट वास असतो आणि त्याची चव आंबट असू शकते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Adultrated Butter : स्वस्तच्या नादात तुम्ही भेसळयुक्त बटर तर वापरत नाही ना? 'या' पद्धतीने तपासा शुद्धता..