TRENDING:

सावधान! उद्यापासून सुरू होणार होलाष्टकचा अशुभ काळ, 8 दिवस 'या' कामांवर असणार बंदी

Last Updated:
हिंदू धर्मात होळीच्या सणाला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व होळीपूर्वीच्या आठ दिवसांना म्हणजेच 'होलाष्टक' काळाला दिले जाते. यंदा 24 फेब्रुवारी 2026, मंगळवारपासून होलाष्टकाचा काळ सुरू होत असून, तो 3 मार्च 2026 पर्यंत असेल.
advertisement
1/7
सावधान! उद्यापासून सुरू होणार होलाष्टकचा अशुभ काळ, 8 दिवस या कामांवर असणार बंदी
हिंदू धर्मात होळीच्या सणाला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व होळीपूर्वीच्या आठ दिवसांना म्हणजेच 'होलाष्टक' काळाला दिले जाते. यंदा 24 फेब्रुवारी 2026, मंगळवारपासून होलाष्टकाचा काळ सुरू होत असून, तो 3 मार्च 2026 पर्यंत असेल.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार, या आठ दिवसांच्या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. असे मानले जाते की, होलाष्टकाच्या काळात ग्रह अत्यंत उग्र आणि नकारात्मक स्थितीत असतात, ज्याचा मानवी जीवनावर आणि कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
advertisement
3/7
विवाहाचे मुहूर्त बंद: होलाष्टक लागताच विवाहाचे सर्व मुहूर्त संपतात. या काळात लग्न किंवा साखरपुड्यासारखे विधी केल्यास वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतात, असे मानले जाते.
advertisement
4/7
गृहप्रवेश आणि नवीन वास्तू: नवीन घरात प्रवेश करणे किंवा नवीन मालमत्ता खरेदी करणे या काळात टाळावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि कुटुंबात सुख-शांतीचा अभाव जाणवू शकतो.
advertisement
5/7
मुंडन आणि 16 संस्कार: नामकरण, मुंडन किंवा उपनयन संस्कार यांसारखे महत्त्वाचे विधी या 8 दिवसांत करू नयेत. शास्त्रांनुसार, हे संस्कार करताना ग्रहांची स्थिती शुभ असणे आवश्यक असते.
advertisement
6/7
नवीन व्यवसाय आणि मोठी गुंतवणूक: जर तुम्ही नवीन व्यापार सुरू करण्याचा किंवा शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तो 3 मार्चपर्यंत पुढे ढकलावा. होलाष्टकात सुरू केलेल्या व्यवसायात यश मिळणे कठीण असते.
advertisement
7/7
वाहन आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी: कार, बाईक किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे या काळात टाळले जाते. नवीन वस्तूचा आनंद घेण्याऐवजी ती वस्तू भविष्यात कटकटीला कारणीभूत ठरू शकते, अशी धारणा आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सावधान! उद्यापासून सुरू होणार होलाष्टकचा अशुभ काळ, 8 दिवस 'या' कामांवर असणार बंदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल